बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
By Admin | Updated: February 27, 2016 22:43 IST2016-02-27T22:37:19+5:302016-02-27T22:43:44+5:30
बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
सायखेडा : भेंडाळी शिवारात अनेक दिवसांपासून दोन बिबट्यांचा मुुक्त संचार सुरू असून, शुक्रवारी सायंकाळी रामनाथ रामकृष्ण शिंदे यांच्या द्राक्षेबागेत आलेल्या बिबट्यांनी शेळीवर हल्ला करत तिला ठार केले. हा प्रकार शिंदे कुटुंबीयांच्या समोर घडल्याने ते भयभीत झाले. मात्र धीर धरत त्यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे शेतकरी जमा झाले. मात्र तोपर्यंत बिबट्यांनी पलायन केले होते.
भेंडाळी परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार आहे. अनेकवेळा वनविभागास कळवले आहे. मात्र वनविभागाने पिंजरा लावला मात्र बिबट्याच्या खाद्याविना !
त्यामुळे बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकतच नाही म्हणून पिंजरा असून, नसल्यासारखा असतो. वनविभाग आता तरी या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच गोरख खालकर, माजी सरपंच भाऊसाहेब कमानकर, सोमनाथ खालकर, राजेंद्र शिंदे यासह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)