नाशिक : ‘ईद-उल-अज्हा’ अर्थात बकरी ईदचा सण येत्या बुधवारी (दि.२२) साजरा होणार असल्याची घोषणा शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी केली. स्थानिक विभागीय चांद समितीचे प्रतिनिधी मुंबईला ग्वाही घेण्यासाठी रवाना झाले होते. मुंबई येथून चंद्रद्रर्शनाची ग्वाही प्राप्त झाल्यानंतर खतीब यांनी ईद साजरी करण्याबाबत अधिकृतरीत्या घोषणा केली.दरवर्षी इस्लामी कालगणनेतील उर्दू महिना ‘जिलहिज्जा’च्या दहा तारखेला बकरी ईद साजरी केली जाते. रविवारी संध्याकाळी सुरतमध्ये चंद्रदर्शन घडले. मुंबई येथील प्रतिनिधींनी सुरत येथे जाऊन धार्मिकदृष्ट्या शास्त्रीय पद्धतीने चंद्रदर्शनाची लेखी ग्वाही प्राप्त केली. त्यानुसार मुंबईच्या राज्यस्तरीय चांद समितीने बकरी ईद बुधवारी साजरी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. स्थानिक नाशिक विभागीय चांद समितीचे पदाधिकारी मुंबईला पोहचलेले होते. त्यांनी चंद्रदर्शनाची लेखी ग्वाही घेत नाशिक गाठले आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ग्वाही दिली. त्यानंतर खतीब यांनी बकरी ईद साजरी करण्याबाबत घोषणा केल्याची माहिती हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी दिली. सकाळी पावणेदहा वाजता सामुदायिकरीत्या मुस्लीमबांधव पारंपरिक पध्दतीने इदगाहवर खतीब यांच्या नेतृत्वाखाली नमाजपठण करणार आहेत. नमाजपठणाचा सोहळा सकाळी लवकर सुरू होणार आहे. मुस्लीम बांधवांनी वेळेपूर्वी दाखल व्हावे, असे आवाहन खतीब यांनी केले आहे. न्यायालयीन आदेशासह धार्मिक शास्त्रीय नियमांचे (शरियत) काटेकोरपणे पालन करत धनिक मुस्लिमांनी ‘कुर्बानी’ करावी, असेही त्यांनी सांगितले.
बकरी ईद : येत्या २२ तारखेला सामुदायिकरित्या नमाजपठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 15:59 IST
रविवारी संध्याकाळी सुरतमध्ये चंद्रदर्शन घडले. मुंबई येथील प्रतिनिधींनी सुरत येथे जाऊन धार्मिकदृष्ट्या शास्त्रीय पद्धतीने चंद्रदर्शनाची लेखी ग्वाही प्राप्त केली. त्यानुसार मुंबईच्या राज्यस्तरीय चांद समितीने बकरी ईद बुधवारी साजरी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. स्थानिक नाशिक विभागीय चांद समितीचे पदाधिकारी मुंबईला पोहचलेले होते.
बकरी ईद : येत्या २२ तारखेला सामुदायिकरित्या नमाजपठण
ठळक मुद्दे चंद्रदर्शनाची लेखी ग्वाही घेत नाशिक गाठले सकाळी पावणेदहा वाजता सामुदायिकरीत्या इदगाहवर नमाजपठण