जाखोरीत शेळीभक्षक बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:15 IST2021-07-28T04:15:50+5:302021-07-28T04:15:50+5:30

जाखोरी येथील शेतकरी शेख शिराजबी सुभानभाई यांच्या मालकीच्या गट नंबर १२४ मध्ये राहत्या घराला लागून असलेल्या गोठ्यात मध्यरात्री ...

Goat-eating leopards seized in Jakhori | जाखोरीत शेळीभक्षक बिबट्या जेरबंद

जाखोरीत शेळीभक्षक बिबट्या जेरबंद

जाखोरी येथील शेतकरी शेख शिराजबी सुभानभाई यांच्या मालकीच्या गट नंबर १२४ मध्ये राहत्या घराला लागून असलेल्या गोठ्यात मध्यरात्री शिरून बिबट्याने एकूण पाच शेळ्यांवर हल्ला करून तीन शेळ्या जागीच ठार, तर दोन शेळ्या गंभीर केल्या होत्या.या घटनेचा पंचनामा वनपरिमंडळ अधिकारी नाशिक अनिल आहिरराव, वनरक्षक गोविंद पंढरे यांनी करून, वन्यप्राण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे शेळ्यांच्या गोठ्यालगत वन विभागाने पिंजरा लावला होता. बुधवारी पहाटे पुन्हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात आला असता, बिबट्या पहाटे जेरबंद झाला. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम वनपाल अनिल आहिरराव, वनरक्षक गोविंद पंढरे, वाहनचालक अशोक खानझोडे यांनी सुरक्षित रेस्क्यू करून, बिबट्याला रेस्क्यू वाहनाने गंगापूर रोपवाटिका येथे नेला. यावेळी सरपंच मंगला जगळे, उपसरपंच प्रकाश पगारे, तुकाराम चव्हाण, गणेश सोनवणे, विश्वास कळमकर,उज्ज्वला जगळे, जया चव्हाण, अर्पिता कळमकर, युवराज जगळे, पिंटू जगळे, संदीप धात्रक, योगेश जाधव, दिनेश क्षीरसागर, योगेश विंचू आदी उपस्थित होते.

(फोटो २७ बिबट्या)

Web Title: Goat-eating leopards seized in Jakhori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.