प्रत्येकी पाच हजार मतदार नोंदणी करण्याचे लक्ष्य
By Admin | Updated: September 29, 2016 01:03 IST2016-09-29T01:02:38+5:302016-09-29T01:03:44+5:30
बैठक : गांभीर्याने पदवीधर निवडणुकीकडे बघण्याची राम शिंदे यांची सूचना

प्रत्येकी पाच हजार मतदार नोंदणी करण्याचे लक्ष्य
नाशिक : येत्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जिंकण्याचा निर्धार प्रत्येक भाजपा पदाधिकाऱ्याने करावा. नाशिक विभागात प्रत्येक मंडल अधिकाऱ्याने किमान पाच हजार पदवीधर मतदारांची नाव नोंदणी करून घेत आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या निवडणुकीकडे गांभिर्याने बघावे, असे आदेश राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी केले.
आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील भाजपा कार्यालयात विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर खासदार हिना गावित, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल अहेर, अपूर्व हिरे, बाळासाहेब मुरकुटे, विजयकुमार गावित, गुरमुख जगवाणी, महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागुल, लक्ष्मण सावजी, नरेंद्र पवार, विजय साने, सुरेश बाबा पाटील, पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष दादा जाधव आदि उपस्थित होते.
कुठलीही निवडणूक ही कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासाच्या जोरावर जिंकली जाते. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत कार्यकर्त्यांनी स्वत:ला झोकून घ्यावे व नियोजनबद्ध पद्धतीने मतदार नोंदणीची कामे करून डॉ. प्रशांत पाटील यांना विक्र मी मतांनी विजयी करावे, असे शिंदे यावेळी म्हणाले.
उत्तर महाराष्ट्रातील आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, मंडल पदाधिकारी, विस्तारक व पदवीधर मतदारसंघ लोकसभा प्रभारी बैठकीला उपस्थित होते. (प्रतिनिधी)