महत्त्वाकांक्षी उपक्रमात नाशिक जिल्ह्यात नऊ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:26 IST2018-03-27T00:26:02+5:302018-03-27T00:26:02+5:30
राज्य सरकारच्या यंदा १३ कोटी वृक्षलागवडीच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमात नाशिक जिल्ह्यातही नऊ लाख वृक्षलागवड करण्यात येणार असून, त्यासाठी वन खात्याने जागा उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन यांनी दिल्या आहेत.

महत्त्वाकांक्षी उपक्रमात नाशिक जिल्ह्यात नऊ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट
नाशिक : राज्य सरकारच्या यंदा १३ कोटी वृक्षलागवडीच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमात नाशिक जिल्ह्यातही नऊ लाख वृक्षलागवड करण्यात येणार असून, त्यासाठी वन खात्याने जागा उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित सर्व खाते प्रमुखांची बैठक घेण्यात आली. यंदा राज्य सरकारने १३ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प सोडला असून, त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यात नऊ लाख वृक्षलागवड जुलै महिन्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी वन, सामाजिक वनीकरण या दोन विभागांना सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा धिकाऱ्यांनी दिल्या. यासंदर्भात ४ एप्रिल रोजी वन सचिव बैठक घेणार असल्यामुळे तत्पूर्वीच माहिती तयार करण्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षी करण्यात आलेली एकूण वृक्षलागवड व त्यातून जगलेल्या रोपांची माहितीही यावेळी संकलित करण्यात आली. ज्या विभागाची ८० टक्क्यापेक्षा कमी झाडे जगली अशा विभागांना यंदा अधिक उद्दिष्ट देण्यात येणार आहे. विशेष करून जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण, पाटबंधारे खात्यांवर अधिक जबाबदारी आहे. वृक्ष लागवडीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे काम वन विभागाचे असून, त्यादृष्टीने जागेची पाहणी करण्याचे ठरविण्यात आले. वृक्ष लागवडीपेक्षा त्याच्या संगोपनावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे ठरविण्यात आले आहे. यंदा राज्य सरकारने १३ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प सोडला असून, त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यात नऊ लाख वृक्षलागवड जुलै महिन्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी वन, सामाजिक वनीकरण या दोन विभागांना सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या.