शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाला चला, तुम्ही विमानाने चला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 18:58 IST

नाशिक -  डेस्टीनेशन मॅरेज करायचे, व-हाडी देशभरात कुठे न्यायचे आहेत की सहलीला जायचे आहे....? तुम्ही फक्त सांगा कोठे जायचे आहे, विमान कंपन्या चार्टर प्लेनने नेण्यासाठी सज्ज आहेत, अशाप्रकारच्या आॅफर्स देण्यासाठी नाशिकमध्ये बड्या विमान कंपन्याचे प्रतिनिधी अक्षरश: घिरट्या घालत आहेत. विशेष म्हणजे एका व्यवसायिकांच्या संघटनेने चार्टर प्लेनने गोवा सहल निश्चित केली असून तीही प्रति प्रवासी दोन हजार रूपये भाड्यात!

ठळक मुद्देप्रवाशांसाठी स्पर्धा:नाशिकमध्ये विमान कंपन्यांच्या घिरट्या

नाशिक -  डेस्टीनेशन मॅरेज करायचे, व-हाडी देशभरात कुठे न्यायचे आहेत की सहलीला जायचे आहे....? तुम्ही फक्त सांगा कोठे जायचे आहे, विमान कंपन्या चार्टर प्लेनने नेण्यासाठी सज्ज आहेत, अशाप्रकारच्या आॅफर्स देण्यासाठी नाशिकमध्ये बड्या विमान कंपन्याचे प्रतिनिधी अक्षरश: घिरट्या घालत आहेत. विशेष म्हणजे एका व्यवसायिकांच्या संघटनेने चार्टर प्लेनने गोवा सहल निश्चित केली असून तीही प्रति प्रवासी दोन हजार रूपये भाड्यात!विमान प्रवास हा तसा धनिकांसाठी मानला गेला असला तरी आता मध्यम आणि उच्च मध्यम वर्ग देखील विमान प्रवास करू लागला आहे. अर्थात, कामानिमित्ताने किंवा सहलीसाठी सुध्दा प्रवास केले जातात. काही कंपन्या हे कॉमन मॅनसाठीच असल्याचे सांगत परवडणारे प्रवास भाडे घेऊन देखील सोय उपलब्ध करतात. परंतु आता केंद्र आणि त्या पाठोपाठ राज्य सरकारचे हवाई धोरणही शिथील होत गेले आणि उडान मुळे तर विमान कंपन्यांना देखील संधी उपलब्ध झाली. केंद्र सरकारच्या उडान योजनेपूर्वीही नाशिकमधून विमान सेवा सुरू करण्यासाठी विविध व्यवसायिक संघटनांशी संपर्क साधून प्रयत्न करीत होते. परंतु पर्यटक आणि उद्योजक व्यावसायिकांच्यापलिकडे जाऊन विविध व्यवसायिक संघटना आणि व्यक्तीगत पार्ट्यांना भेटून विमान सेवेच्या विविध आॅफर्स देण्यास तयार झाल्या आाहेत.देशभरात कुठेही लग्न सोहळ्यासाठी जायचे असल्यास चार्टर बोर्इंग उपलब्ध करून दिले जाईल, इतकेच नव्हे तर कुठे परिषद किंवा अगदी सहलीसाठी जायचे असेल तरीही अशाप्रकारची सेवा नाशिकमधून कुठेही विशेषत: विमानतळ असलेल्या ठिकाणी नेण्याची तयारी संबंधीत कंपन्या अत्यंत अल्प दरात दाखवत आहेत. नाशिकच्या एका व्यवसायिक संघटनेने कामाचा ताण हलका करण्यासाठी आपल्या दीडशे सदस्यांची सहल गोव्यास नेण्याची तयारी दर्शविली असून त्यामुळे कंपनीने प्रति प्रवासी दोन हजार ते एकवीसशे अशा दरात त्यांना गोव्यासाठी चार्टर प्लेन उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे हवाई प्रवास करू इच्छीणाऱ्यांसाठी सध्या तरी अच्छे दिन आल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकairplaneविमान