होर्डिंग्जमधून नेत्यांची चमकोगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:50 IST2017-10-27T00:50:31+5:302017-10-27T00:50:40+5:30
अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याबाबत न्यायालयाने कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

होर्डिंग्जमधून नेत्यांची चमकोगिरी
नाशिक : अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याबाबत न्यायालयाने कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकमधील चौकाचौकांत अनधिकृत होर्डिंग्ज झळकत असताना, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. शहरात सर्वच भागात कोणीही होर्डिंग्ज लावत असून, त्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरून अपघात होत आहेत. या होर्डिंग्जच्या वादांतून अनेकदा हाणामारीचे प्रकारही झाले असून, शहरात तणावाची स्थिती निर्माण होण्यास होर्डिंग्ज कारणीभूत ठरलेले असल्यामुळे शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज तत्काळ हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दिवाळीत नेत्यांच्या चमकोगिरीला पुन्हा वेग आल्याने होर्डिंग्जच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले असून, विविध भागांत शुभेच्छांचे मोठमोठे होर्डिंग्ज लागलेले आहेत. शहर परिसरासह उपनगरांमध्ये व शहरातील विविध रस्त्यांवर दिवाळीनंतर चार-पाच दिवस उलटूनही अनेक होर्डिंग्ज झळकत असून, त्र्यंबकरोड,गंजमाळ, द्वारका, पंचवटी कारंजा, निमाणी बसस्टॅँड आदी परिसरात स्थानिक नेत्यांसह वेगवेगळ्या पक्षांच्या लोकप्रतिनिधींनीही अनधिकृतरीत्या होर्डिंग्ज लावून चमकोगिरी केली आहे. यात वेगवेगळ्या पक्षांनी तसेच गटांनी एका जागेवर होर्डिंग्ज लावले असल्याने परस्पर तणावाचे संबंध
शहरातील शांततेला धोक ा निर्माण करू शकतात.