दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या सेवकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:38 IST2020-12-04T04:38:34+5:302020-12-04T04:38:34+5:30
नाशिक : जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने प्रहार अपंग संघटना व आरसी एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा स्मारक येथे दिव्यांगांसाठी काम ...

दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या सेवकांचा गौरव
नाशिक : जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने प्रहार अपंग संघटना व आरसी एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा स्मारक येथे दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून मनपा गटनेते व नगरसेवक जगदीश पाटील, रवींद्र पाटील, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या महिलाध्यक्ष संध्या जाधव, शंकर हिरे , सुरोजित सेनगुप्ता , कुसुम बोरीचा उपस्थित होते. दिव्यांग असूनही दिव्यांगसेवा करणारे आर. सी. एज्युकेशनचे संचालक रवींद्र पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारत सरकार यांच्या वतीने संगणक प्रशिक्षण घेतलेल्या २५ दिव्यांग व्यक्तिंना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले, दोन दिव्यांग विद्यार्थिनी शरवाणी कबाडे व जरिन मिर्झा यांना पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देण्यात आले. कर्णबधिर व्यक्तिंना श्रवण यंत्र वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रहार अपंग संघटनेचे महिला अध्यक्ष संध्या जाधव, रवींद्र पाटील, शहराध्यक्ष ललित पवार, कार्याध्यक्ष बबलू मिर्झा, उपशहराध्यक्ष रूपेश परदेशी, जेकब पिल्ले, संजय पोरजे, पंकज सूर्यवंशी, रवींद्र टिळे, सुनील पवार, विलास चहाळे, आदींसह दिव्यांग उपस्थित होते.
(फोटो: ०३दिव्यांग)