काव्यलेखन स्पर्धेतील साहित्यिकांचा गौरव
By Admin | Updated: July 28, 2014 00:45 IST2014-07-27T23:57:53+5:302014-07-28T00:45:43+5:30
काव्यलेखन स्पर्धेतील साहित्यिकांचा गौरव

काव्यलेखन स्पर्धेतील साहित्यिकांचा गौरव
नाशिक : येथील ग्रामविकास मंडळाच्या वतीने संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कूलच्या सभागृहात राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट साहित्यकृतीसह कुसुमाग्रज काव्यलेखन स्पर्धेतील पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून परभणीचे साहित्यिक आसाराम लोमटे, जनकल्याण बॅँकेचे अध्यक्ष नानासाहेब सोनवणे, विष्णुपंत गायखे, राजाराम गायधनी, अशोक गायधनी आदि उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार कवी विवेक उगलमुगले, जॉन रॉड्रीग्ज, डॉ. आप्पासाहेब पवार यांना देण्यात आला. तसेच कुसुमाग्रज काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्या किरणकुमार मडावी, रूपाली खैरनार, विजय बागुल, गीता गायकवाड, संदीप गुजराथी यांनाही गौरविण्यात आले. दीपक गायधनी, सुनील आगळे यांना उत्कृष्ट वाचक पुरस्कार देण्यात आला.
यावेळी अनिल ढेरिंगे, रवींद्र मालुंजकर, विनोद ढेरिंगे, शकिलाबानो मुलाणी, जाकीर शेख, श्रीधर पांडे, संपत ताजनपुरे, अॅड. शरद गायधनी, रामचंद्र शिंदे, संदीप गायखे, प्रशांत कापसे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)