शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांच्या टोळक्याचा प्रताप; गांधी तलावातील चार बोटी पेटविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 14:33 IST

मागील अनेक वर्षांपासून गांधी तलावात बोटींगचा व्यवसाय संबंधिताकडून केला जात आहे. काठालगत उभ्या केलेल्या चार मोठ्या बोटी अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्रीनंतर पेटवून देत परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्दे पुर्ववैमनस्यातून प्रकार घडल्याचा पोलिसांचा संशयतलावात येऊन उभ्या चार बोटींना आग

पंचवटी : गोदावरीचा प्रवाह सध्या खळाळत नसल्याने अहल्यादेवी होळकर पुलापासून रामकुंडापर्यंत गांधी तलाव कोरडेठाक झाले आहे. त्यामुळे येथील बोटिंग क्लब चालविणाऱ्या ठेकेदारच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या चार बोटी देवमामलेदार मंदिराजवळ काठवर उभ्या करुन ठेवलेल्या असताना बुधवारी (दि.२४) पहाटेच्या सुमारास अज्ञात गुंडांच्या टोळक्याने या बोटींवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार सकाळी उघडकीस आला.मागील अनेक वर्षांपासून गांधी तलावात बोटींगचा व्यवसाय संबंधिताकडून केला जात आहे. काठालगत उभ्या केलेल्या चार मोठ्या बोटी अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्रीनंतर पेटवून देत परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने केलेल्या या जाळपोळीत चारही बोटी जळून राख झाल्या आहेत. सकाळी जेव्हा हा प्रकार पंचवटी पोलिसांना समजला तेव्हा पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत जाळलेल्या बोटींची पाहणी केली. याप्रकरणी दुपारी उशीरापर्यंत कोणीही तक्रार नोंदविण्यासाठीपुढे आले नव्हते असे पोलिसांनी सांगितले.या जाळपोळीमागे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्याचा हात असल्याचे बोलले जात आहे. पूर्ववैमनस्यातून चारही बोटी जाळल्याची गोदाकाठावर चर्चा आहे.रामकुंड हे धार्मिक तीर्थक्षेत्र असून शेकडो भाविक देवदर्शनासाठी गंगाघाटावर दररोज येतात. नदीपात्रात असलेल्या वाहत्या पाण्यात बोटींच्या माध्यमातून पर्यटक नौकाविहाराचा आनंद घेत असतात. याबाबत महापालिकेने ए्का ठेकेदाराला ठेका दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून स्मार्ट सिटीअंतर्गत कामे गोदाकाठालगत सुरू असल्याने नौकाविहार बंद करण्यात आले आहे. ठेकेदाराने त्याच्या ताब्यातील त्या चार बोटी गांधी तलावात कोपऱ्यात उभ्या करून ठेवल्या आहेत. बुधवारी पहाटेच्या सुमाराला अज्ञातांनी गांधी तलावात येऊन उभ्या चार बोटींना आग लावून त्या पेटवून दिल्या. बोटीला लाकुड आणि प्लॅस्टिक वापरलेले असल्याने काही वेळातच या बोटींचा जळून कोळसा झाला याप्रकरणी पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयgodavariगोदावरीCrime Newsगुन्हेगारी