तर इमारती ठरतील काचेची कब्रस्ताने

By Admin | Updated: July 22, 2014 00:55 IST2014-07-22T00:23:36+5:302014-07-22T00:55:35+5:30

तर इमारती ठरतील काचेची कब्रस्ताने

The glass graveyard will be the building | तर इमारती ठरतील काचेची कब्रस्ताने

तर इमारती ठरतील काचेची कब्रस्ताने

मुंबईच्या आगीचा धडा : नियमाच्या अंमलबजावणीबाबत संभ्रम; शहरातही वाढतेय फॅडनाशिक : उंच उंच इमारती विशेषत: व्यापारी संकुलांना दर्शनी भागात चकचकीत काचा लावण्याचे फॅड कसे जीवाशी बेतते हे गेल्या आठवड्यात मुंबईत लागलेल्या आगीच्या घटनेनंतर लक्षात आले आहे. तथापि, नाशिकमध्ये अशाप्रकारच्या काचांचे वेड वाढत असून, कोणत्याही नियम निकषाशिवाय सर्रासपणे त्यांचा वापर होत आहे. काचा वापरण्याचे नियम नाही अशातला भाग नाही, परंतु त्याची अंमलबजावणी कोणी करावी, असा प्रश्न असल्याने काचा लावलेल्या अनेक इमारती धोकादायक ठरत आहेत.
गेल्या आठवड्यात मुंबई येथील अंधेरी भागात लोटस या प्रकल्पाला आग लागली. या दुर्घटनेत अग्निशमन दलाचा एक जवान शहीद झाला, तर २० नागरिक जखमी झाले. मुंबईसारख्या शहरात सुविधा असल्याने तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरमुळे ३२ जणांचे प्राण वाचले हे खरे असले तरी इमारतीला शोभेसाठी लावलेल्या काचा आगीमुळे तडकल्या आणि त्यामुळेच अनेक जण जखमी झाले. साहजिकच अशा काचांच्या उपयुक्ततेविषयी आणि सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिकमध्येही सध्या व्यापारी संकुलांना अशा प्रकारच्या काचा बसविण्याचे फॅड वाढत आहे. काचांमुळे इमारती आकर्षक दिसत असल्या तरी त्याचा धोका अधोरेखित झाला आहे. अशा प्रकारच्या काचांमुळे नाशिकसारख्या ठिकाणी उन्हाळ्यात वातावरण तापण्यास अधिकच मदत होत असून, त्याचा परिणाम गेल्या काही वर्षांत दिसू लागला आहे. त्यातच आगीच्या या दुर्घटनेमुळे वापरावरील नियंत्रणाचादेखील विचार होऊ लागला आहे.
सद्यस्थितीत नगररचना विभागात काचांना प्रतिबंध करणारा असा कोणताही कायदा नाही, असे नगररचना विभागाचे म्हणणे आहे, तर नॅशनल बिल्डिंग कोडमध्ये इमारतीच्या सर्वच रचनांचा ऊहापोह झाला असून, त्यात काचांचा वापर कसा करावा याचादेखील उल्लेख आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होतेच असे नाही, अर्थात बिल्डिंग कोडमध्ये विद्युत, विकास नियंत्रण नियमावली अशा विविध प्रकारचे निकष संबंधितांनी बघितले पाहिजे, असे त्यात अपेक्षित असल्याचे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे.
मुळात काचांचा वापर करणे ही पाश्चात्य पद्धती आहे. तेथील वातावरणाचा विचार करताना इमारतीत उजेड रहावा यासाठी काचांचा वापर होत असला तरी आपल्याकडे त्याचे सर्रास अनुकरण होत आहे. मुंबईच्या आगीच्या प्रकरणातून धडा न घेतल्यास नाशिकमध्ये अशी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)

Web Title: The glass graveyard will be the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.