शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुंडेंना पुरस्कार दिल्याने व्याख्यानांचे अनुदान रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 05:12 IST

सार्वजनिक वाचनालयाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार दिला म्हणून वसंत व्याख्यानमालेचे अनुदान पालिकेने रोखले आहे.

नाशिक : येथील सार्वजनिक वाचनालयाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार दिला म्हणून वसंत व्याख्यानमालेचे अनुदान पालिकेने रोखले आहे. महापालिका भाजपाच्या ताब्यात असून याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने १६ वर्षांपासून कार्यक्षम आमदार पुरस्कार दिला जातो. माजी आमदार व पत्रकार कै. माधवराव लिमये यांच्या स्मरणार्थ नेर्लीकर दांपत्य यांच्या देणगीतून या पुरस्काराचे वितरण होते.यावर्षी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र मुंडे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यापासून पदाधिकाऱ्यांवर दबाव आणला जात होता, असा खेद वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी जाहीर समारंभातच व्यक्त केला.वाचनालयाचे कार्यवाह असलेले श्रीकांत बेणी हे वसंत व्याख्यानमालेचेही अध्यक्ष असल्याने व्याख्यानमालेचे अनुदान देऊ नये, यासाठी महापालिका आयुक्तांवर दबाव असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. या संदर्भात बेणी यांनी आयुक्तांना पत्र दिले असूनअनुदान रोखणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.>यंदा धनंजय मुंडे यांचे नाव पुरस्कारासाठी जाहीर झाल्यानंतर हा पुरस्कार रद्द करावा, यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींकडून दबाव आणला गेला, परंतु पुरस्कार निवडीसाठी स्वतंत्र समिती असून, त्या समितीचा हा निर्णय असल्याने कार्यकारी मंडळाने त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.- श्रीकांत बेणी, कार्यवाह, सार्वजनिक वाचनालय.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडे