खुर्चीला दिले निवेदन
By Admin | Updated: August 14, 2016 22:19 IST2016-08-14T22:14:18+5:302016-08-14T22:19:29+5:30
येवला : कॉलनी भागात विजेचा लपंडाव

खुर्चीला दिले निवेदन
येवला : शहरातील बाजीरावनगर वसाहतीमध्ये महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या वीजपुरवठा करणाऱ्या तारा लोंबकळत असून, वीजपुरवठा केव्हाही खंडित होतो. या तारांची दुरुस्ती करण्यात येऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी रहिवाशांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. कार्यकारी अभियंता जागेवर नसल्याने निवेदन त्यांच्या खुर्चीला चिटकविण्यात आले. अखेर निवेदनाचा परिणाम म्हणून शनिवारी दुपारी वीज पूर्ववत झाली.
अनेक लोकांच्या वीज जोडण्या एकमेकांच्या घरावरून गेलेल्या आहेत. छतावर गेल्यास जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. याविषयी अनेकवेळा वितरणकडे तक्र ार केलीे मात्र तक्रारीची दखल घेतली गेली नाहीे. अखेर संतप्त नागरिकांनी आज येथील कार्यकारी अभियंत्याकडे तक्र ार केली आहे. निवेदनावर दत्तात्रय वैद्य, लक्ष्मण सोनवणे, रखमाजी भड, भाऊसाहेब मगर, नवनाथ उंडे, लक्ष्मण दाणे, सचिन ढिकले, अशोक गाडे, गणेश निकम, भीमराज
मुंगसे, त्र्यंबक पाटील, भागवत
जाधव, सत्यवान गायकवाड
आदिंसह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)