सिडको परिरसरात योग दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:10 IST2021-06-22T04:10:57+5:302021-06-22T04:10:57+5:30

यावेळी योग शिक्षक सतीश घोगरे यांनी योगाचे महत्त्व विशद करताना नियमित योगामुळे शरीराच्या अवयवांसोबत मन, मेंदू आणि आत्म्याचं ...

To give yoga in the premises of CID | सिडको परिरसरात योग दिन

सिडको परिरसरात योग दिन

यावेळी योग शिक्षक सतीश घोगरे यांनी योगाचे महत्त्व विशद करताना नियमित योगामुळे शरीराच्या अवयवांसोबत मन, मेंदू आणि आत्म्याचं संतुलन केलं जातं, त्यामुळे शारीरिक व मानसिक त्रासापासून आपणास मुक्ती मिळत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी योगाचे प्रात्यक्षिक सादर करीत प्राणायाम, योगासने करून घेतली. या कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष बाळासाहेब पाटील, सचिव संदीप पाटील, मुख्याध्यापक आर.एम. पाटील, एम. डी. हयाळीज, एस. एस. भालेराव, विद्या पाटील, किशोर चौधरी, लकेश देसले, कुमुद मोरे, सुरेंद्र कदम बांडे, के. एस. देवकर, एम. व्ही. पाटील, पी. सी. घोरपडे, सविता वाघ, कविता पालवे, भाऊसाहेब भामरे आदी सहभागी झाले होते.

-----------------------

के.बी.एच. विद्यालय, पवननगर

सिडको : पवननगर येथील के. बी. एच. विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित के. बी.एच. विद्यालय पवननगर या शाळेत योगा शिक्षक वाणी, पाटील, सूर्यवंशी यांनी विद्यालयातील सर्व शिक्षकांना ‌योग व मानवी आरोग्य याचे महत्त्व सांगितले. शिक्षकांकडून काही योगासने, प्राणायाम करून घेतले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अप्पा पवार, उपमुख्याध्यापक रवींद्र नवसारे, पर्यवेक्षिका युगंधरा देशमुख आदींची उपस्थिती होती. ‌सर्वात शेवटी योगमंत्र देण्यात आला. याप्रसंगी योगधामच्या सर्व शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

-------------–-------.

सिडको : जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने

लोकनेता प्रतिष्ठान व श्री स्वामी समर्थ मित्रमंडळाच्या वतीने प्रभाग 27 मध्ये योगा शिक्षकांचा वृक्ष व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

सिडको प्रभाग २७ मधील स्वामी समर्थ उद्यान, तसेच अश्विननगर येथील हॅप्पी थॉट्स येथे सकाळी योगा व प्राणायामचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानंतर महिला नगरसेवक कावेरी घुगे व लोकनेता प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद घुगे यांच्या हस्ते योग शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला व योग शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक बुधाजी पानसरे, गंभिरे, वाणी, आवाळे, वाजे, गांगुर्डे यांच्यासह अश्विननगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिलांची उपस्थिती होती.

Web Title: To give yoga in the premises of CID

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.