शिक्षकांना टीईटीसाठी मुदतवाढ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:11 IST2021-06-21T04:11:14+5:302021-06-21T04:11:14+5:30
उर्दू शिक्षक संघटनेचे संस्थापक साजिद निसार अहमद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याबाबत निवेदन अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांना दिले. ...

शिक्षकांना टीईटीसाठी मुदतवाढ द्या
उर्दू शिक्षक संघटनेचे संस्थापक साजिद निसार अहमद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याबाबत निवेदन अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, शिक्षण हक्क कायदा २००९ मधील कलम २३च्या तरतुदीनुसार शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणेसाठी राज्य सरकारने ३१ मार्च २०१९ ही अंतिम मुदत दिलेली होती. तथापि या मुदतीत टीईटी उतीर्ण न झालेले सुमारे आठ हजार प्राथ. व माध्य. शिक्षक महाराष्ट्रात आहेत. त्यांना टीईटी उत्तीर्ण होणेसाठी मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे. कारण महाराष्ट्र राज्य खासगी शाळा सेवाशर्ती नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार शिक्षक सेवेमध्ये कायम झालेले आहेत, यातील बरेच शिक्षक हे दि. ३१ मार्च २०१९ या मुदतीनंतर टीईटी उतीर्ण झालेले आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार ही परीक्षा उतीर्ण होण्यासाठी वर्षातून दोन वेळा या हिशेबाने किमान दहा वेळा परीक्षा घेऊन सदर टीईटी उतीर्ण होण्याची संधी द्यावयास पाहिजे होती, ती दिली गेली नाही. ३१ मार्च २०१९ या मुदतीत केवळ सहा वेळाच ही परीक्षा घेतलेली आहे. तसेच टीईटी परीक्षेची काठिण्यपातळी ही उच्च दर्जाची असल्याने या परीक्षांचा निकाल दोन ते अडीच टक्के असतो., त्याचा फटका या शिक्षकांना बसलेला आहे. सुमारे दहा वर्षापर्यंत सेवा झालेल्या या शिक्षकांना सेवेतून कमी केल्यास सुमारे ८ हजार शिक्षकांचा संसार उघड्यावर पडणार आहे, याकडे मानवतावादी दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. सेवेत कायम असलेल्या सुमारे ८ हजार शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.