पैसा, बंगला, गाडी द्या अन्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:13 IST2021-07-25T04:13:45+5:302021-07-25T04:13:45+5:30
नाशिक : नवविवाहितांना हुंड्यासाठी सासरच्या ठिकाणी विविध त्रासाचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आता नवीन नाहीत. मात्र काळ बदलत ...

पैसा, बंगला, गाडी द्या अन्
नाशिक : नवविवाहितांना हुंड्यासाठी सासरच्या ठिकाणी विविध त्रासाचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आता नवीन नाहीत. मात्र काळ बदलत असून विचारधारासुद्धा बदलायला हवी. परंतु दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. परिणामी विवाहितांचा हुंड्यासाठी छळाची तक्रार दररोज शहरातील तेरा पैकी एकातरी पोलीस ठाण्याच्या दप्तरी दाखल होत असते. कधी घर घेण्यासाठी तर कधी व्यवसाय सुरू करण्यासाठी तर कधी गाडी खरेदीकरिता अशा एक ना अनेक कारणांपोटी माहेरून पैसे आणून देण्याचा तगादा सासरच्या मंडळींकडून लावला जात असल्याचे बहुतांश तक्रारींमधून समोर येते. लग्न दोन्ही पक्षांकडून मोठ्या थाटामाटात आटोपले जाते, तत्पूर्वी लग्न जमविताना सगळ्या गोष्टींवर वधू-वरपक्षाच्या वडिलधाऱ्यांकडून चर्चाही केली जाते, मग विवाह झाल्यानंतर जेमतेम एक किंवा दोन वर्षात असे काय घडते की, थेट माहेरून पैसे आणण्याची मागणी होऊ लागते अन् या मागणीपोटी केला जाणारा छळ त्या नवविवाहितेलाच भाेगावा लागतो. अनेकदा तर ज्याच्यासोबत रेशीमगाठी बांधल्या गेल्या तो पतीदेखील अशावेळी साथ सोडल्याचेही दिसून येते. पोलिसांकडे दाखल होणाऱ्या तक्रारींमध्ये पती दोषी नाही, असे कधीही आढळून येत नाही. छळ करणाऱ्या सासरच्या संशयित लोकांच्या यादीत पतीच्याही नावाचा समावेश असतोच.
---इन्फो---
हुंडा म्हणायचा की पोराचा लिलाव?
१) हुंडबळी कायदा अस्तित्वात असला तरीदेखील या कायद्याची भीती दिवसेंदिवस समाजात कमी होताना दिसत आहे. हुंड्यामध्ये थेट रोहाऊस, दुकान, रिक्षा, कार खरेदीकरिता हजारो ते लाखो रुपयांची मागणी नवविवाहितेकडे माहेरून रक्कम आणून देण्यासाठी केली जाते.
२) अनेकदा तर लग्न जमवितानाच हुंड्यावर चर्चा झडते. वधूपक्षाकडे वरपक्षाकडून सर्रासपणे रोख रक्कम, दागदागिने, वाहनांच्या स्वरुपात हुंडा मागितला जातो.
३) मुलगा-मुलगी एकमेकांना पसंत करत असले तरीदेखील हुंड्याची मागणी लग्न जमविण्यापूर्वी आजही केली जाते. जिल्ह्यातील गावपातळीवरच नव्हे तर शहरामध्येसुध्दा अशापध्दतीने हुंड्यासाठी ‘बोली’ लागते.
---इन्फो---
हुंड्यात मागतो २१नखी कासव, लॅब्रोडर श्वान
साखरपुडा आटोपल्यानंतर लग्नाचा ‘मुहूर्त’ धरण्यासाठी दोन्ही पक्ष औरंगाबादला एकत्र आले असता नाशिकच्या एका वरपक्षाकडून चक्क मुलीला नोकरीसाठी दहा लाख रुपये तसेच २१नखी कासव, लॅब्रोडर जातीचे श्वानसह अन्य चीजवस्तूंची अजब मागणी केली गेल्याने लग्न जमत-जमता वधूपक्षाकडून मोडले गेले. वधूपक्षाच्या लोकांनी औरंगाबाद जिल्ह्यातील एका शहरातील पोलीस ठाण्यात नाशिकच्या वर पक्षाच्याविरुद्ध हुंड्यात दहा लाखाच्या रकमेसह ही अजब मागणी केल्याची फिर्यादही दाखल केली.
--आलेख---
...अशी आहे आकडेवारी
२०१८- २१४
२०१९- २५९
२०२०- १५१
२०२१- ०००
---
240721\24nsk_12_24072021_13.jpg
हुंडा