‘देव द्या’चा उपक्रम यंदाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST2021-09-13T04:14:37+5:302021-09-13T04:14:37+5:30
नाशिक : घरगुती गणेशोत्सवातील दीड दिवसाच्या गणपती मूर्तींचे संकलन करून ‘देव द्या, देवपण घ्या,’ या उपक्रमास यंदादेखील सुरुवात ...

‘देव द्या’चा उपक्रम यंदाही !
नाशिक : घरगुती गणेशोत्सवातील दीड दिवसाच्या गणपती मूर्तींचे संकलन करून ‘देव द्या, देवपण घ्या,’ या उपक्रमास यंदादेखील सुरुवात करण्यात आली असून, त्याला नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे.
गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने गत १० वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाची सुरुवात झाली आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती, त्यांवर केलेले रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधनांमुळे गोदावरीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. ‘देव द्या, देवपण घ्या,’ हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदाचे या उपक्रमाचे अकरावे वर्ष आहे. समितीकडे आलेल्या गणेशमूर्ती मंगलमय व पवित्र वातावरणात नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने कृत्रिम तलावात विधीवत विसर्जित केल्या जात असल्याचे विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी सांगितले.