शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या

By Admin | Updated: April 4, 2017 00:33 IST2017-04-04T00:27:18+5:302017-04-04T00:33:07+5:30

चांदवड : चांदवड तालुका राष्ट्रीय कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

Give full debt relief to farmers | शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या

 चांदवड : चांदवड तालुका राष्ट्रीय कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्या वतीने चांदवड तहसीलदार कार्यालयासमोर सोमवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण माजी आमदार शिरीष कोतवाल व उत्तम भालेराव, तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, तालुकाध्यक्ष संजय जाधव, उपसभापती अमोल भालेराव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी आमदार निर्मला गावित यांनी प्रांताधिकारी भीमराज दराडे व तहसीदार डॉ. शरद मंडलिक यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, चांदवड तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात येत असून, चांदवड तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात नेहमीच गारपीट, दुष्काळ या नैसर्गिक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे उत्पादन घेण्यात आले आहे. परंतु शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या पिकाचे मोल बाजारपेठेत होत नाही. शेतकऱ्यास नाइलाजास्तव उत्पादन खर्चापेक्षा कमी भावाने शेतमाल विक्र ी करावा लागत आहे. शेतमाल नाशवंत असल्याने जास्त दिवस साठवून ठेवता येत नाही. काढणीनंतर लगेच विक्र ी करावा लागतो. शेतकरीवर्गास आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी व त्याच्या कष्टास न्याय देण्यासाठी १०० टक्के कर्जमाफी देण्याबाबत शासनाने योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.
यावेळी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल व उत्तमबाबा भालेराव, राष्ट्रीय कॉँग्रेसचे येथील अध्यक्ष संजय जाधव, कार्याध्यक्ष समाधान जामदार, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, खंडेराव अहेर, नवनाथ अहेर, उपसभापती अमोल भालेराव, तुकाराम सोनवणे, रिजवान घासी, शिवाजी यमाजी अहेर, प्रकाश शेळके, दीपांशू जाधव, उत्तमराव ठोंबरे, बाळासाहेब माळी, कांतीलाल बाफना, नगरसेवक अल्ताफ तांबोळी, खरेदी-विक्री संघाचे सभापती गणेश ठाकरे, खंडू सोमवंशी, औचित खेतरे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Give full debt relief to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.