रायसोनी पतसंस्थेतून ठेवी द्या

By Admin | Updated: August 22, 2014 00:28 IST2014-08-21T21:59:40+5:302014-08-22T00:28:11+5:30

मागणी : प्रांताकडे निवेदन सादर

Give deposits from Raisoni Credit Society | रायसोनी पतसंस्थेतून ठेवी द्या

रायसोनी पतसंस्थेतून ठेवी द्या

मालेगाव : येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-आॅप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड, जळगावच्या मालेगाव शाखेतील ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळावी, अशी मागणी शहर-तालुक्यातील ठेवीदारांनी प्रांत संदीप पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
रायसोनी सोसायटीचा विकास व विस्तार पाहून तेथे शहर - तालुक्यातील ठेवीदारांनी आपल्या ठेवी ठेवल्या; परंतू गेल्या वर्षभरापासून या सोसायटीत काही घोटाळे झाले. त्यामुळे सर्व ठेवीदार आपल्या ठेवी परत मागत आहेत. काही ठेवीदारांच्या मुलामुलींचे लग्न ठरले आहे. मात्र, ठेवी परत मिळत नसल्यामुळे ते होऊ शकलेले नाहीत. काहींना आजारपणासाठी पैशांची आवश्यकता आहे. मात्र त्यांनाही उपचारासाठी स्वत:चा पैसा मिळू शकलेला नाही.
सदर सोसायटीतर्फे वेळोवेळी पैसे देण्याचे आश्वासन देऊनही पैसे देण्यात आलेले नाहीत. परिणामी ठेवीदार हवालदिल झालेले आहेत. त्यामुळे या प्रकरणात प्रांत कार्यालयाकडून कार्यवाही होऊन ठेवीदारांना त्यांची ठेवी परत मिळवून देण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी वालचंद छाजेड, धनराज चोरडिया, भरत शाह, आनंद भावसार, राजेंद्र बधान, सतीश भावसार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Give deposits from Raisoni Credit Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.