गिसाकावर उद्या महामेळावा
By Admin | Updated: March 30, 2016 01:28 IST2016-03-30T01:27:07+5:302016-03-30T01:28:07+5:30
मालेगाव : सहकार बचाव अभियान; मेधा पाटकर येणार

गिसाकावर उद्या महामेळावा
मालेगाव : गिरणा सहकारी साखर कारखाना व २९८ एकर जमीन सक्तवसुली संचालनने (ईडी) जप्त केला आहे. सदर कारखाना पुन्हा सभासदांच्या ताब्यात मिळावा या मागणीसाठी दाभाडीतील गिसाका येथे ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत उद्या गुरुवारी ३१ मार्च रोजी दुपारी ३ वाजता सभासद, शेतकरी व कामगार यांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती शिवाजी पाटील यांनी पत्रकान्वये दिली.
सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) गिसाकावर टाच ठेवल्याच्या निर्णयाचे जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयतर्फे स्वागत करण्यात आले असून, ईडीने लवकरात लवकर सर्व मालमत्ता ताब्यात घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गिरणा साखर कारखाना भुजबळ यांच्या मालकीच्या आर्मस्ट्रॉँग इन्फा प्रा. लि.ने २७ कोटी ५५ लाख रुपये अशा अल्प किमतीत खरेदी केला. बाजारभावाप्रमाणे आज या मालमत्तेची किंमत ३०० कोटीपेक्षा जास्त आहे. सदर कारखाना विक्री करताना त्याचे मूल्यांकन राजकीय दबावातून कमी केले. यामुळे महाराष्ट्र सरकार बचाव अभियान व गिसाका बचाव समिती यांनी न्यायालयाद दावा दाखल केलेला आहे. त्यातच गिसाका व २९८ एकर जमीन सक्त वसुली संचालन ईडीने जप्त केलेला आहे.
गिसाकाचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी येथील शेतकरी, सभासद, कामगार व समर्थक लढत राहिले. हा निर्णय केंद्र व राज्य शासनाच्या संस्थांनी घेतला असे महाराष्ट्र सहकार बचाओ अभियानचे समन्वयक गिसाका आंदोलनाचे अध्यक्ष यशवंत अहिरे यांनी सांगितले. गिसाकाचा प्रश्न नसून महाराष्ट्रातल चाळीस साखर कारखाने अशा प्रकारे सर्वच पक्षाच्या नेत्यांनी गिळंकृत केले आहेत. गिसाका बाबत सहकार बुडवणाऱ्या यंत्रणेची, त्या मागील नेत्यांची चौकशी व्हावी अशी मागणी सदस्य के. एन. अहिरे यांनी केली.