मुलींमध्ये रचना क्लब, मुलांमध्ये उत्कर्ष क्लबला अजिंक्यपद

By Admin | Updated: May 11, 2014 22:27 IST2014-05-11T22:24:43+5:302014-05-11T22:27:02+5:30

कुमार-कुमारी चषक कबड्डी स्पर्धा

Girls 'Club in the Design Club, and the Utkarsh Club in the boys' championship | मुलींमध्ये रचना क्लब, मुलांमध्ये उत्कर्ष क्लबला अजिंक्यपद

मुलींमध्ये रचना क्लब, मुलांमध्ये उत्कर्ष क्लबला अजिंक्यपद

कुमार-कुमारी चषक कबड्डी स्पर्धा
नाशिक : येथे सुरू असलेल्या कुमार-कुमारी गटाच्या आमदार जयंतराव जाधव चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या मुलींच्या गटाचे विजेतेपद रचना क्लबने पटकावले, तर मुलांच्या गटात गतविजेत्या सय्यदपिंप्रीच्या उत्कर्ष क्रीडा मंडळाने अजिंक्यपद कायम राखले.
क्रीडा प्रबोधिनी व जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने यशवंत व्यायामशाळेच्या मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉ. मंगेश चव्हाण, अनिल ढिकले, हरीश गुप्ता, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष मोहन गायकवाड, दौलतराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुलींच्या गटात सुपर लीगच्या धर्तीवर रचना स्पोर्ट्स क्लबने विजेतेपद पटकावले. रचना क्लबने लीगमध्ये क्रीडाभारती, गुलालवाडी आणि शिवशक्ती आडगाव या संघांवर मात करीत ६ गुणांची कमाई केली होती, तर उपविजेत्या ठरलेल्या क्रीडाभारतीने शिवशक्ती आडगाव व गुलालवाडी संघाला नमविले. रचना क्लबकडून पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांचे चार गुण झाले होते. रचना क्लबकडून निकिता पवार, सोनाली धोत्रे, प्रणाली लहानगे यांनी उत्कृष्ट खेळ केला, तर क्रीडाभारतीकडून श्रुती जाडर, संजना गायकवाड, समीरा सय्यद यांनी उत्कृष्ट खेळ केला.
मुलांच्या गटामध्ये क्रीडा प्रबोधिनी संघाने उपांत्य फेरीत नांदुर्डीच्या जनता विद्यालयास नमवून अंतिम फेरी गाठली, तर गतविजेत्या सय्यदपिंप्रीच्या उत्कर्ष क्रीडा मंडळाने मोहोळच्या जय बजरंग व्यायामशाळेला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली.
चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीत गतविजेत्या सय्यदपिंप्रीच्या उत्कर्ष क्रीडा मंडळाने क्रीडा प्रबोधिनीला ११ गुणांनी नमवून अजिंक्यपद कायम राखले. उत्कर्ष क्रीडा मंडळाने क्रीडा प्रबोधिनीला ३०/१९ अशा फरकाने पराभूत केले. उत्कर्षकडून भगवान ढिकले, गणेश बोराडे यांनी, तर क्रीडा प्रबोधिनीकडून जयेश देवरे, राजू मांढरे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

Web Title: Girls 'Club in the Design Club, and the Utkarsh Club in the boys' championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.