मैत्रिणींच्या घरातच दागिन्यांची चोरी

By Admin | Updated: January 26, 2017 00:28 IST2017-01-26T00:28:25+5:302017-01-26T00:28:40+5:30

तरुणीचा प्रताप : इंदिरानगर पोलिसांत गुन्हा

Girlfriends steal in friends' house | मैत्रिणींच्या घरातच दागिन्यांची चोरी

मैत्रिणींच्या घरातच दागिन्यांची चोरी

नाशिक : मैत्रिणींशी सलगी वाढवून त्यांच्याच घरातील दागिन्यांवर हात साफ करणाऱ्या तरुणीला इंदिरानगर पोलिसांनी अटक केली असून, तिला न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावली आहे. आठ दिवसांच्या अंतराने दोन ठिकाणी या तरुणीने मैत्रिणींनाच चुना लावत लाखोंचे दागिने लंपास केले.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित पूजा तांदळे हिने आपल्या नातेवाइकाच्या घरातील सुमारे अडीच लाखांच्या दागिन्यांवर हात साफ केले.  तांदळे हिने आपल्या नात्यातील गायत्री उमेश चकोर यांना  चुना लावला.   तांदळे हिने ओळखीचा फायदा घेत चकोर यांच्या  हिलटॉप या इमारतीच्या फ्लॅटमधून कपाटात ठेवलेले दोन लाख साठ हजारांचे दागिने लंपास  केले. याप्रकरणी चकोर यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर तिला अटक करण्यात आली होती.
सदर वृत्त दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाल्यानंतर असाच काहीसा प्रकार आपल्याही बाबतीत घडल्याचा आणि  तांदळे हीच आरोपी असल्याची बाब शुभांगी दीपक निफाडे यांच्या लक्षात आली. त्यानंतर निफाडे यांनी पोलीस ठाणे गाठून संशयित तांदळे हिने आपल्या घरातून १ लाख ७७ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद दाखल केली. आपल्याशी ओळख वाढवून तिने दागिन्यांवर हात साफ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Girlfriends steal in friends' house