फेसबुकद्वारे मैत्री करून तरुणीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:39 IST2017-08-09T00:39:04+5:302017-08-09T00:39:18+5:30

फेसबुकद्वारे मैत्री करून मुलीच्या घरच्यांना मैत्रीची माहिती देण्याची धमकी देत विधीसंघर्षित बालकाने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना सिडको परिसरात घडली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी देवळाली कॅम्पमधील विधीसंघर्षित बालकाविरोधात बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़

Girlfriend raped by Facebook by friendship | फेसबुकद्वारे मैत्री करून तरुणीवर बलात्कार

फेसबुकद्वारे मैत्री करून तरुणीवर बलात्कार

नाशिक : फेसबुकद्वारे मैत्री करून मुलीच्या घरच्यांना मैत्रीची माहिती देण्याची धमकी देत विधीसंघर्षित बालकाने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना सिडको परिसरात घडली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी देवळाली कॅम्पमधील विधीसंघर्षित बालकाविरोधात बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवळाली कॅम्पमधील सतरा वर्षीय युवकाने जुलै २०१६ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून सिडकोतील १७ वर्षीय युवतीसोबत मैत्री केली़ या मुलीकडून तिची माहिती व पत्ता घेतल्यानंतर संबंधित तरुण भेटण्यासाठी तिच्या घरी गेला असता मुलीने मित्र असल्याचे सांगितले़ यामुळे तरुण पुढे वारंवार या तरुणीच्या घरी जाऊ लागला व त्याने सेल्फीच्या नावाखाली मोबाइलमध्ये तरुणीचे चित्रविचित्र फोटो काढले़ यानंतर सिडकोतील या तरुणीच्या घरी जात या युवकाने मोबाइलमधील फोटो दाखवून तिच्यावर बलात्कार केला़ या शारीरिक संबंधाचे फोटो काढून तरुणीच्या आईला दाखविण्याचे धमकी देऊन त्याचा तरुणीवर अत्याचार सुरू होता़ ही बाब तरुणीच्या आईला समजताच तिने याबाबत विचारणा केली असता सदर युवकाने वाईट-साईट शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केली़
या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे करीत आहेत़

Web Title: Girlfriend raped by Facebook by friendship