प्रियकराकडूनच प्रेयसीची निर्घृण हत्या

By Admin | Updated: June 1, 2017 02:03 IST2017-06-01T02:03:15+5:302017-06-01T02:03:25+5:30

प्रियकरानेच प्रेयसीची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. हर्षदा आहिरे (२१) असे मृत युवतीचे नाव असून, याप्रकरणी प्रियकरास ताब्यात घेण्यात आले आहे.

Girlfriend murdered by a boyfriend | प्रियकराकडूनच प्रेयसीची निर्घृण हत्या

प्रियकराकडूनच प्रेयसीची निर्घृण हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : एकलहरा येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख अखेर पटली असून, प्रियकरानेच प्रेयसीची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. हर्षदा आहिरे (२१) असे मृत युवतीचे नाव असून, याप्रकरणी प्रियकरास ताब्यात घेण्यात आले आहे.
एकलहरा रोडवरील किर्लोस्कर कंपनीच्या कंपाउंडलगत मंगळवारी सकाळी हर्षदा भास्कर आहिरे (२१) रा. म्हाडा कॉलनी, कलानगर, दिंडोरीरोड या तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासांत तिचा प्रियकर रोहित रवींद्र पाटील (२१) रा. अशोकनगर, सातपूर यास ताब्यात घेतले. बुधवारी दुपारी नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता त्यास सहा दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मयत हर्षदा ही बी.एस्सीच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत होती. ती कॉलेज रोडवरील विद्यासागर क्लासेसमध्ये समुपदेशनाचे काम करीत होती. तर रोहित हा इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत असून, या दोघांचे गेल्या चार वर्षांपासून (११ वी पासून) प्रेमसंबंध होते. सोमवारी दुपारी हर्षदा व रोहित हे प्रेमीयुगुल दिंडोरीला जाणार होते; मात्र त्यांचे जाणे रद्द झाल्याने हर्षदा ही रोहितला भेटण्यासाठी गेली. हर्षदा रोहितच्या दुचाकीवरून थोडे फिरल्यानंतर दोघेही रोहितच्या घरी गेले. रोहितचे आई-वडील गावी गेले आहेत, तर बहीण बाजारात गेली होती.
दुपारी साडेचार-पावणे पाचच्या सुमारास हर्षदाने रोहितकडे लग्न करण्याचा आग्रह धरला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या रोहितने हर्षदाच्या गळ्यावर, हाताच्या दंडावर, पाठीवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात ती जागीच मयत झाली.
रोहितने रात्री एक-दीडच्या सुमारास हर्षदाचा मृतदेह एका मोठ्या सुटकेसमध्ये बंद केला. त्यानंतर माईस्ट्रो दुचाकी (एमएच १५, ईटी ९०२) वर सुटकेस पुढे ठेवून व रॉकेलची कॅन सोबत घेऊन तो सातपूरहून एकलहरारोड किर्लोस्कर कंपनीजवळ आला.

Web Title: Girlfriend murdered by a boyfriend