शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

तरुणीचा विनयभंग करून बेदम मारहाण़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:46 IST

मैत्रिणीसमवेत पायी जाणाऱ्या तरुणीस सहा संशयितांनी अडवून तिचा बुरखा ओढून विनयभंग करीत बेदम मारहाण केल्याची घटना वडाळागावातील अमन मेडिकलजवळ घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पाच जणांना अटक केली आहे़

नाशिक : मैत्रिणीसमवेत पायी जाणाऱ्या तरुणीस सहा संशयितांनी अडवून तिचा बुरखा ओढून विनयभंग करीत बेदम मारहाण केल्याची घटना वडाळागावातील अमन मेडिकलजवळ घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पाच जणांना अटक केली आहे़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आपल्या मैत्रिणीसमवेत मंगळवारी (दि़ १९) सकाळी वडाळागावातील अमन मेडिकलजवळून पायी जात होती़ यावेळी संशयित शौक मुजफ्फर शहा (१९) याने तरुणीला अडवून अश्लील शिवीगाळ केली़ यानंतर या तरुणीचा बुरखा फाडून विनयभंग करीत बेदम मारहाण केली़ यामध्ये तरुणी जखमी झाल्याने तिचे कुटुंबीय जाब विचारण्यासाठी गेले असता संशयित तौफिक खालिद शेख (२३), वसिम बशीर सय्यद (३२), रिजवान फिरोज खान (२८), इम्तियाज उमर शेख (३२) व शौकत काका जहूर शहा (सर्व रा. वडाळागाव, नाशिक) यांनी लाथाबुक्क्यांनी तसेच रॉडने मारहाण करून जखमी केले.  या घटनेत पीडित तरुणीचा नातेवाईक रमिज शेख हा जखमी झाला आहे़ या प्रकरणी पीडित तरुणीने इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़निलगिरी बागेत एकाची आत्महत्यानाशिक : राहत्या घरात वायरने गळफास घेत एकाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़ २१) दुपारच्या सुमारास औरंगाबाद रोडवरील निलगिरी बाग परिसरात घडली़ नामदेव सुखदेव अहिरे (४७, रा. घर नंबर ५४, बिल्डिंग नंबर ४, निलगिरी बाग, औरंगाबाद रोड) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नामदेव अहिरे यांनी गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घरातील पंख्यास वायरच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़घरमालकावर गुन्हा दाखलनाशिक : भाडेतत्त्वावर दिलेल्या घरात राहणाºया भाडेकरूची माहिती स्थानिक पोलिसांना न देणाºया घरमालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ देवरतन पंडित (रा. सातपूर) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयित घरमालकाचे नाव आहे. पंडित यांनी आपले घरात भाडेकरू ठेवले मात्र स्थानिक पोलीस ठाण्यास याची माहिती दिलीच नाही़ या प्रकरणी पोलीस शिपाई विवेक भदाणे यांनी फिर्याद दिली आहे़दुचाकी अपघातात पाथर्डीतील युवकाचा मृत्यूनाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील पांडवलेण्याजवळील नेहरू वनोद्यानासमोर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात पाथर्डी फाट्यावरील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ दत्तात्रय दुर्गादास ओगले (३२, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघाताची इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि़ १८) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दत्तात्रय ओगले हे दुचाकीने पाथर्डी फाट्यावरून विल्होळीकडे जात होते़ महामार्गावरील नेहरू उद्यानाजवळ त्यांची दुचाकी घसरून झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा