आझादनगर : शहरातील हुडको कॉलनी येथील मनपा शाळा क्रमांक ३२च्या इयत्ता चौथीच्या वर्गखोलीच्या छताचे प्लास्टर विद्यार्थ्यांच्या अंगावर पडल्याने अलिजानाझ अन्वर शाह ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे, तर तिघा विद्यार्थिनींना किरकोळ दुखापत झाली आहे. अलिजानाझ हिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.गत तीन दिवसांपासून रिमझिम पावसामुळे गुरुवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान वर्ग सुरू होताच छताचा काही भाग विद्यार्थिनींच्या अंगावर कोसळला. त्यामुळे अलिजानाझच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. शिक्षकांनी तिला उपचारार्थ सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. सदर घटनेमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेने मनपा शिक्षण मंडळ प्रशासन मंडळ खडबडून जागे झाले. हुडको कॉलनी (गरीब नवाझ हॉल) येथे सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेच्या खोल्या बांधण्यात आल्या आहेत. २००६ पासून या वर्गखोल्यांमध्ये मनपाच्या शाळेत वर्ग सुरू आहे. सकाळ सत्रात शाळा क्र. ६८ व दुपार सत्रात ३२ अशा दोन शाळेत पहिली ते सातवी अनुक्रमे २६७ व २५९ असे एकूण ५२६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.मात्र निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे अवघ्या पाच-सहा वर्षातच वर्गखोलींसह इमारतीच्या छताचे भाग पडू लागले आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी २०१३ पासून तत्कालीन नगरसेवक सुगराबी नबी अहमद व विद्यमान नगरसेवक निहाल अहमद मोहंमद सुलेमान यांच्यासह मुख्याध्यापकांनी तब्बल नऊ वेळा पत्र देऊन शाळेच्या सद्यस्थितीबाबत मनपास अवगत करण्यात आले होते. याची दखल घेत मनपा आयुक्तांनी शाळेस भेट देऊन पाहणी केली होती. मात्र यापुढे कुठलीही कार्यवाही मनपाकडून झाली नाही.मालेगाव मध्यचे आमदार आसिफ शेख यांनी शहरातील मनपाच्या शाळांना संगणक वितरित केले आहेत. तसेच आमदार निधीतून लाखो रुपये खर्चून नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले आहे. मात्र दुसरीकडे मनपाच्या शाळा इमारतीच्या दुरवस्थेबाबत आमदार शेख उदासीन दिसून येत आहेत.
मालेगावी वर्गखोलीचा स्लॅब कोसळून विद्यार्थिनी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:27 IST
आझादनगर : शहरातील हुडको कॉलनी येथील मनपा शाळा क्रमांक ३२च्या इयत्ता चौथीच्या वर्गखोलीच्या छताचे प्लास्टर विद्यार्थ्यांच्या अंगावर पडल्याने अलिजानाझ अन्वर शाह ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे, तर तिघा विद्यार्थिनींना किरकोळ दुखापत झाली आहे. अलिजानाझ हिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
मालेगावी वर्गखोलीचा स्लॅब कोसळून विद्यार्थिनी जखमी
ठळक मुद्देदुर्लक्ष : प्रशासनाविरोधात नाराजी;पालकांमध्ये भीतीचे वातावरण