एक मुलगी, एक झाड
By Admin | Updated: July 15, 2016 01:40 IST2016-07-15T01:40:08+5:302016-07-15T01:40:54+5:30
ओझरखेड : जनता हायस्कूलमधील निर्णय

एक मुलगी, एक झाड
दिंडोरी : तालुक्यातील ओझरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व जनता हायस्कूलमध्ये ‘एक मुलगी, एक झाड’ या उपक्र मांतर्गत सरपंच गंगाधर निखाडे यांनी प्रत्येक विद्यार्थ्यास एक केशर जातीचे आब्यांचे रोप याप्रमाणे १५० रोपे दिली.
यावेळी शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. सर्व झाडांचे जतन करून जगवण्याची ग्वाही विद्याथ्यानी दिली. कार्यक्र माला सरपंच गंगाधर निखाडे, कृषी अधिकारी बागुलसाहेब, अॅड. चंद्रकांत शिरसाठ, केंद्रप्रमुख ह्याळीज सर, शिंदे सर, राऊत सर, ग्रामसेवक शंकर माळोदे, उपसरपंच परसराम गांगोडे, स्टार इलेव्हन कंपनीचे संचालक राहुल बच्छाव, नामदेव निखाडे, गणेश पाटील, हेमराज अडसरे, योगेश चव्हाण, सागर निखाडे, उत्तम निखाडे, शरद निखाडे, बापू डंबाळे, संदीप महाले, सुकदेव शेखरे, सुनील गवळी, अशोक दवंगे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. (वार्ताहर)