नाशिक : मेळा बसस्थानकात बसची वाट पाहत असलेल्या महिलेचे लक्ष विचलित करून तिच्याकडील रोकड चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़१८) रात्रीच्या सुमारास घडली़ मध्य प्रदेश येथील रहिवासी रश्मी घनश्याम चौरसिया या रात्री नऊ वाजेच्या सुमारास बसची वाट पाहत होत्या़ त्यावेळी तेथे असलेले दाम्पत्य व त्यांच्या मुलीने लक्ष विचलित करून त्यांच्याकडील पाकिटासह १७ हजार ५०० रु पयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी चौरसिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
मेळा स्थानकात महिलेची रोकड चोरली
By admin | Updated: August 19, 2015 23:52 IST