मुलीने पोलीस अधिकारी पित्याला दाखविला सुरीचा धाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:26 IST2021-03-04T04:26:39+5:302021-03-04T04:26:39+5:30
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, स्नेहबंधन पार्कमध्ये राहणारे पोलीस उपनिरीक्षक फिर्यादी मोहन बाळू काकडे (५०) आणि त्यांच्या मुलीमध्ये १० ...

मुलीने पोलीस अधिकारी पित्याला दाखविला सुरीचा धाक
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, स्नेहबंधन पार्कमध्ये राहणारे पोलीस उपनिरीक्षक फिर्यादी मोहन बाळू काकडे (५०) आणि त्यांच्या मुलीमध्ये १० हजारांची रक्कम देण्याघेण्यावरून वाद झाले. यावेळी घरात मुलीची मैत्रीणदेखील होती. वाद विकोपाला गेल्याने संतप्त झालेल्या मुलीने स्वयंपाकघरात जाऊन पालेभाज्या चिरण्याची सुरी आणून बापाला धमकाविण्याचा प्रयत्न केला तसेच तिच्या मैत्रिणीने चहाची किटली उचलून काकडे यांच्या डोक्यावर मारली. यामुळे काकडे हे जखमी झाले. हा सगळा प्रकार मंगळवारी (दि.२) रात्री दीड वाजेच्या सुमारास घडला. यानंतर सकाळी काकडे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या मुलीसह तिच्या मैत्रिणीविरुद्ध फिर्याद दाखल केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघींविरुद्ध मारहाण करत दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक धुळे करीत आहेत.