धोंडेगावात बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 01:38 AM2022-04-28T01:38:53+5:302022-04-28T01:39:16+5:30

नाशिक तालुक्यातील पश्चिम भागात बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत. बुधवारी (दि. २७) रात्रीच्या सुमारास एका साडेसहा वर्षांच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात दुर्दैवाने बालिकेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नाशिक वनपरिक्षेत्राचे पथक घटनास्थळी रवाना झाले. गायत्री नवनाथ लिलके (रा. मूळ कोचरगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे.

Girl killed in leopard attack in Dhondegaon | धोंडेगावात बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार

धोंडेगावात बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार

Next
ठळक मुद्देरात्री घडली घटना : मामाच्या घरी आलेल्या भाचीला गमवावा लागला जीव

नाशिक : तालुक्यातील पश्चिम भागात बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत. बुधवारी (दि. २७) रात्रीच्या सुमारास एका साडेसहा वर्षांच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात दुर्दैवाने बालिकेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नाशिक वनपरिक्षेत्राचे पथक घटनास्थळी रवाना झाले. गायत्री नवनाथ लिलके (रा. मूळ कोचरगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे.

कोचरगाव येथे राहणारी गायत्री काही दिवसांपूर्वी धोंडेगावात तिच्या मामाच्या घरी आली होती. रात्री घराबाहेर खेळत असताना बिबट्या अचानकपणे आला आणि गायत्रीवर झडप टाकली. यावेळी ती प्रचंड घाबरली आणि बिबट्याने तिला जखमी केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी आजूबाजूच्या रहिवाशांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने गायत्रीला जबड्यातून सोडून देत धूम ठोकली. गिरणारे पंचक्रोशीतील हा पंधरवड्यात दुसरा हल्ला आहे. १० एप्रिल रोजी साडगाव रस्त्यावर सकाळी सहा वाजेच्या सुमारास एका मजुरावर बिबट्याने हल्ला चढविला होता. सुदैवाने या हल्ल्यात तो मजूर बचावला. गिरणारेपासून काही अंतरावरच असलेल्या धोंडेगावात हा हल्ला झाला. दरम्यान, गंगापूर-गोवर्धन शिवारातसुद्धा रात्री साडेदहा वाजता काही दुचाकीचालकांना बिबट्या रस्ता ओलांडताना नजरेस पडल्याचे काही लोकांनी वनखात्याला संपर्क करून माहिती दिली. वनकर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन खात्री केली असता, बिबट्याच्या पाऊलखुणा किंवा कुठल्याही सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या दिसला नाही. येथील हॉटेल व्यावसायिक तसेच रहिवाशांना सावध राहण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या भागातील बिबटे अन्नपाण्याच्या शोधात भटकंती करू लागल्याने नागरिकांनी पहाटे व संध्याकाळनंतर घराबाहेर भटकंती करू नये, अथवा उघड्यावर शौचासाठी जाऊ नये, असे आवाहन वन खात्याने केले आहे.

Web Title: Girl killed in leopard attack in Dhondegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.