विवाहाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार
By Admin | Updated: June 14, 2017 00:41 IST2017-06-14T00:40:45+5:302017-06-14T00:41:05+5:30
विवाहाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार

विवाहाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदिरानगर : विवाहाचे आमिष दाखवून वडाळागावातील अल्पवयीन मुलीवर गत चौदा महिन्यांपासून लैंगिक अत्याचार
सुरू असल्याचे प्रकरण समोर आले आहे़
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळागाव परिसरातील झिनतनगर येथील संशयित शाह हसन नवाब याने चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस विवाहाचे आमिष दाखवून ओळख वाढवली़ यानंतर डिसेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत मुलीला शरयू नगरीच्या पाठीमागील भवानी माथा येथे व सेंट सादीक स्कूलच्या मोकळ्या जागी घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला.
या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित शाह हसन नवाब विरोधात बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़