राष्ट्रीय जलतरणमध्ये गिरिशाला कांस्य
By Admin | Updated: July 23, 2014 00:27 IST2014-07-22T23:30:15+5:302014-07-23T00:27:23+5:30
राष्ट्रीय जलतरणमध्ये गिरिशाला कांस्य

राष्ट्रीय जलतरणमध्ये गिरिशाला कांस्य
नाशिक : भोपाळ येथे पार पडलेल्या ४१व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नाशिकची खेळाडू गिरिशा टोकेकर हिने कांस्य पदक पटकावले़
जलतरण स्पर्धेत कनिष्ठ गटात वॉटर पोलो या क्रीडा प्रकारात गिरिशाने कांस्यपदक पटकावले़ तिच्यासह १४ वर्ष गटात सिद्धी कोतवाल हिने ८०० मीटर फ्रीस्टाईमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली़ गिरिशा व सिद्धी या दोघी भोसला स्वीमिंग क्लबच्या खेळाडू असून, त्यांना प्रशिक्षक शंकर मादगुंडी, घनश्याम कुंवर व विलास देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले़