शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

उपोषण मागे घेण्याची अण्णांना विनंती करणार- गिरीश महाजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 10:49 IST

त्र्यंबकेश्वर येथे आज संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेला प्रारंभ झाला. आज सकाळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर येथे आज संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेला प्रारंभ झाला.आज सकाळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. पालकमंत्री आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.

नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे आज संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेला प्रारंभ झाला. आज सकाळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अण्णांनी सुरू ठेवलेल्या उपोषणावर भाष्य केलं आहे.ते म्हणाले, या वयात अण्णांना उपोषण झेपणार नाही. त्यामुळे अण्णांनी तात्काळ उपोषण सोडावे, अण्णा हजारे यांचं उपोषण मागे घेण्यासाठी मी पुन्हा त्यांची भेट घेणार असल्याचंही गिरीश महाजनांनी सांगितलं आहे. शिवसेना-भाजपाच्या होऊ घातलेल्या युतीवर ते म्हणाले, शिवसेना-भाजपाची युती व्हावी अशी खालपासून वरपर्यंत सर्वांचीच इच्छा आहे, शिवसेनेच्या नेत्यांना सुबुद्धी द्यावी, यासाठी निवृत्तीनाथांचा चरणी प्रार्थना केली. तसेच राज्यासमोरील दुष्काळाचं संकट दूर व्हावे, असं निवृत्तीनाथांना साकडं घातलं आहे.  वारकऱ्यांचे भोंगे बंद करणाऱ्या नाशिकच्या पोलिसांना जाब विचारणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. श्रीसंत सदगुरू निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्या निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी स्थळाचे दर्शन घेण्याच्या ओढीने पायी दिंडी सोहळ्यात दाखल होऊन त्र्यंबकेश्वरची वाट तुडवत येणा-या वारकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपली आहे. कुशावर्तावर दशमी एकादशी या दिवशी आपापल्या शरीराला सोसवेल तशी कुशावर्ताच्या थंडगार पाण्याने वेळ मिळेल त्याप्रमाणे आंघोळी करीत आहेत. कुशावर्त परिसरात वासुदेव मंडळी आपल्या पितरांच्या नावाने दान पावतात. म्हणजे दान घेऊन उद्धार करतात. त्र्यंबक नगरपरिषद व श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने हार-फुले तर गजानन महाराज संस्थानतर्फे उपरणे देऊन दिंड्यांचे स्वागत प्रातिनिधिक स्वरुपात प्रत्येक दिंडी प्रमुखाचा सत्कार स्वागत करण्यात येत आहे. विशेष म्हणजे दिंडी कुठून आली, गाव तालुका व जिल्ह्या बरोबरच दिंडीत किती वारकरी आहेत, महिला पुरुष याबाबतची माहिती लिहून घेतली जात आहे. 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजन