शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे बंड शमविण्यासाठी गिरीश महाजन नाशकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:46 IST

विधानसभा निवडणुकीत ठिकठिकाणी असलेली नाराजी आणि काही ठिकाणी शिवसेनेने केलेली बंडखोरी या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश महाजन हे सोमवारी (दि.१४) नाशकात दाखल झाले. त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बंद दाराआड बैठकादेखील घेतल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देडॅमेज कंट्रोल : भाजपातील नाराजीही दूर करणार

नाशिक : विधानसभा निवडणुकीत ठिकठिकाणी असलेली नाराजी आणि काही ठिकाणी शिवसेनेने केलेली बंडखोरी या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश महाजन हे सोमवारी (दि.१४) नाशकात दाखल झाले. त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बंद दाराआड बैठकादेखील घेतल्याचे वृत्त आहे.विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती असली तरी नाशिकमध्ये मात्र काही ठिकाणी वेगळे चित्र दिसत आहे. नाशिक शहरात एकूण चार पैकी तीन मतदारसंघांत भाजपाचे उमेदवार आहेत. मात्र युती असूनही शिवसेनेचे मात्र पाठबळ मिळताना दिसत नाही. नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारीच्या विरोधात शिवसेनेने बंडखोरी करून युतीला आव्हान दिले आहे. यासंदर्भात थेट उघडपणे भाजपाच्या विरोधाची भूमिका घेतली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडे भाजपाने त्यासंदर्भात तक्रारी केल्यानंतर त्यांनी शिवसेना नगरसेवकांची बैठक घेतली, मात्र त्यांना बंड शमविता न आल्याने त्यांनी थेट शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात चेंडू टोलावला. परंतु उद्धव ठाकरे यांनीदेखील याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अजूनही तिढा कायम आहे. निवडणूक अवघ्या चार ते पाच दिवसांवर आली असतानादेखील त्याबाबत निर्णय न झाल्याने आता तातडीनेनिर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.केवळ नाशिक पश्चिममध्येच नाही तर अन्य मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांसाठी शिवसेनेची सक्रियता जेमतेमच आहे.भाजपातील नाराजांनाही तंबी?भाजपाच्या विरोधात केवळ शिवसेनेचीच नाराजी आहे असे नाही तर भाजपा अंतर्गतदेखील राजी-नाराजी दिसत आहे. नाशिक पूर्व आणि मध्य मतदारसंघातदेखील पक्षाचे अनेक कार्यकर्ते, नगरसेवक प्रचारासाठी बाहेर पडलेले नाही. त्याबाबत उघडपणे चर्चा होत असल्याने पालकमंत्री गिरीश महाजन पक्षातील नाराजांनादेखील तंबी दिल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Girish Mahajanगिरीश महाजनNashikनाशिकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा