ठाणगाव विद्यालयास २११ पुस्तकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 06:14 PM2020-02-18T18:14:33+5:302020-02-18T18:15:55+5:30

ठाणगाव : येथील कै. पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयास परिक्रमा संस्थेकडून २११ पुस्तकांची भेट देण्यात आली.

 Gift of 5 books to Thangaon School | ठाणगाव विद्यालयास २११ पुस्तकांची भेट

ठाणगाव विद्यालयास २११ पुस्तकांची भेट

Next

प्राचार्य व्ही. एस. कवड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्र मास शालेय समितीचे सदस्य नामदेव शिंदे, डी. एम. आव्हाड, अरुण केदार, परिक्रमा संस्थेचे अध्यक्ष गौरव गाजरे, अंकुर काळे, रामदास भोर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यालयाच्या वाचनालयासाठी दिलेल्या विविध पुस्तकांमध्ये विज्ञान, पर्यावरण, इतिहास ,संस्कार व संस्कृती ,व्यसनमुक्ती यासह महात्मा गांधी यांचे माझे सत्याचे प्रयोग ,साने गुरु जी यांचे चंद्रोदय, रामाचा शेला तसेच वैज्ञानिक खेळणी व उपकरण, फास्टर फेणे, भारतातील कर्तृत्ववान महिला, दुर्गाच्या देशातून विज्ञानातील अनपेक्षित शोध, आपले पुष्पमित्र, भारतीय सागर आणि किनारे ज्ञानसमर्पण मृत्यूचा सौदागर - तंबाखू करिअर प्लॅनिग, पावसाचे निसर्गविज्ञान नागरी परंपरेचे लोकाविष्कार या सारख्या विविध पुस्तकांचा समावेश आहे. पर्यवेक्षक बी. बी. पगारे, आर. सी. काकड, आर. एम. मणियार, एस.पी. रेवगडे, पी. बी. थोरात, आर. डी. सांगळे, गिरीजा पावडे, सुनीता सोनवणे, लक्ष्मी वायल, रविंद्र मेंगाल, अनिल जगताप, सचिन ठुबे, सुभाष बेद्रे, गौरवी कापडणीस, दीपक दरेकर आदी उपस्थित होते. ए. बी. कचरे यांनी सुत्रसंचालन तर एस. एस. शेणकर यांनी आभार मानले.
 

Web Title:  Gift of 5 books to Thangaon School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.