घोटीला प्रीमिअर लीग क्रिकेट सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:47 IST2021-02-05T05:47:09+5:302021-02-05T05:47:09+5:30
घोटी येथे प्रदर्शन पटांगण येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत घोटी टायगर्स, घोटी सोल्जर, घोटी किंग इलेव्हन, घोटी इंडियन्स, घोटी ...

घोटीला प्रीमिअर लीग क्रिकेट सामने
घोटी येथे प्रदर्शन पटांगण येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत घोटी टायगर्स, घोटी सोल्जर, घोटी किंग इलेव्हन, घोटी इंडियन्स, घोटी चॅपियन, घोटी फायटर, घोटी वारियर्स, घोटी सुपर स्टार, या आठ संघांना संघमालकांनी लिलाव करून या स्पर्धेसाठी तयार केले आहेत. या स्पर्धेतील सामने सहा षटकांचे असून, मैदानावर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, जि.प. सदस्य नयना गावीत, संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने, कुलदीप चौधरी, सरपंच सचिन गोणके, उपसरपंच रामदास भोर, घोमको चेअरमन रवींद्र गोठी, सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, आदींसह निलेश काळे, निलेश आंबेकर, मनोहर किर्वे, विशाल शिंदे, विक्रम मुनोत, दशरथ भटाटे उपस्थित होते.
फोटो- ०१ घोटी गुडमॉर्निंग
===Photopath===
010221\01nsk_19_01022021_13.jpg
===Caption===
फोटो- ०१ घोटी गुडमॉर्निंग