घोटी-सिन्नर रस्त्यावर टॅँकर उलटला
By Admin | Updated: January 21, 2016 21:51 IST2016-01-21T21:51:07+5:302016-01-21T21:51:40+5:30
घोटी-सिन्नर रस्त्यावर टॅँकर उलटला

घोटी-सिन्नर रस्त्यावर टॅँकर उलटला
घोटी : घोटी-सिन्नर रस्त्यावर गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मुंबईहून नागपूरला डिझेल घेऊन जाणारा टॅँकर समोरील वाहनाने हुलकावणी दिल्याने रस्त्यालगत पलटी झाला. या अपघातात चालक व क्लीनर गंभीर झाले असून जखमींना घोटीच्या ग्रामीण रु ग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबईहून नागपूरला डिझेल घेऊन जाणारा एम.एच ४६ ए आर ०७६९ हा सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घोटी-सिन्नर रस्त्याने पिंपळगाव मोर शिवारातून जात असताना एका वळणावर समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने टॅँकरला हुलकावणी दिल्याने तो रस्त्यावर पलटी झाला.
दरम्यान टॅँकर पलटी झाल्यानंतर त्यातून इंधन गळती होऊ लागली.
हा प्रकार काँग्रेस नेते संपतराव काळे यांनी तत्काळ घोटी पोलिसांना कळविला.
अपघाताची माहिती समजताच घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्यासह हवालदार संजय सांगळे, संदीप शिंदे, दत्ता हांडगे, संदीप झाल्टे आदिंनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त टॅँकरची इंधन गळती थांबविली व अपघातग्रस्त टॅँकर रस्त्यावरून हटविला व ठप्प झालेली वाहतूक पूर्वपदावर सुरू केली. या अपघातात चालक यांच्यासह क्लीनर जखमी झाले आहेत. (वार्ताहर)