शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

देवळालीत घोलप यांचा धक्कादायक पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 01:10 IST

गेल्या ३५ वर्षांपासून देवळाली मतदारसंघाचे प्रतिनिधी करणाऱ्या घोलप यांचा पराभव करून राष्टवादीच्या सरोज अहिरे यांनी धक्कादायक निकालाची नोंद केली. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी तीस वर्ष मतदारसंघ राखला, तर मागील पाच वर्ष त्यांचे पुत्र योगेश घोलप यांची सत्ता असलेल्या मतदारसंघात अहिरे यांनी ४१ हजार ७०२ इतक्या प्रचंड मताधिक्याने विजय मिळवित इतिहासही घडविला.

नाशिकरोड : गेल्या ३५ वर्षांपासून देवळाली मतदारसंघाचे प्रतिनिधी करणाऱ्या घोलप यांचा पराभव करून राष्टवादीच्या सरोज अहिरे यांनी धक्कादायक निकालाची नोंद केली. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी तीस वर्ष मतदारसंघ राखला, तर मागील पाच वर्ष त्यांचे पुत्र योगेश घोलप यांची सत्ता असलेल्या मतदारसंघात अहिरे यांनी ४१ हजार ७०२ इतक्या प्रचंड मताधिक्याने विजय मिळवित इतिहासही घडविला. या मतदारसंघात सुरुवातीपासूनच घोलप आणि अहिरे यांच्यातच सरळ लढत होती. प्रदीर्घ कालावधीपासून मतदारसंघ ताब्यात असतानाही त्यांची चांगलीच दमछाक झाली. मतमोजणीच्या एकूण १९ फेऱ्यांमधील अहिरे यांचे मताधिक्क पाहता मतदारसंघातील कोणत्याही भागातून घोलप यांना मतांची आघाडी मिळालेली दिसत नाही. ग्रामीण भागावर मदार असलेल्या घोलप यांना ग्रामीण भागातून चांगलाच फटका बसला. शरद पवार यांच्या झंझावती प्रचारदौºयांमुळे ग्रामीण भागातील मतदारांनी राष्टÑवादीच्या पारड्यात टाकलेली मते अहिरे यांना लाभदायक ठरली. जुने सामाजिक समीकरणे आणि समाजघटकांच्या मतांवर अहिरे यांचा विजय सुकर झाला. मतदारांमध्ये परिवर्तनाची भावना झालेली असतानाही घोलप पिता-पुत्र गाफील राहिल्याने त्यांच्या परतीचे मार्ग बंद झाले.विजयाची तीन कारणे...1घोलप कुटुंबीयांच्या हाती देवळाली मतदारसंघ असतानाही विकासाची अपेक्षित कामे न झाल्याने मतदारसंघात असलेली नाराजी.2माजी आमदार बाबुलाल सोमा अहिरे यांची कन्या असल्याने देवळाली गावातील पारंपरिक मतदारांनी सरोज अहिरे यांना केलेली मदत आणि मतदान.3शरद पवार यांच्यावर भाजपाने केलेल्या आरोपांमुळे ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानातून पवारांची पाठराखण केली. त्याचा लाभही अहिरे यांना झाला.घोलपांच्या पराभवाचे कारण...गेल्या ३५ वर्षांच्या सत्ता काळात मतदारसंघात प्रकल्पांकडे दुर्लक्ष झाल्याने कामगार, शेतकरी नाराज होतेच शिवाय पक्षवाढीसाठी प्रयत्न नसल्याची पक्षांतर्गत नाराजीही निवडणुकीत उमटली. एकाच कुटुंबाकडे सत्ता आणि पक्षनेत्यांशी संवाद नसल्यानेही पराभवाचे धनी.पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते१ अमोल पठाडे बसपा १४७६२ योगेश घोलप शिवसेना ४२,६२४३ सिद्धांत मंडाले मनसे ३१९८४ अमर पठाडे बसपा २४९५ गौतम वाघ वंचित ब. आ. ९२२३६ विक्रांत लोखंडे पीपल पार्टी आॅफ इंडिया २१६७ विलास खरात आंबेडकर राइट पार्टी ३५६८ प्रमोद अहिरराव अपक्ष ५१३९ रवि बागुल अपक्ष ३५६१० रविकिरण घोलप अपक्ष ५७१११ रवींद्र साळवे अपक्ष ८१६

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019deoli-acदेवळीNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूक