घोटीत खासगी बसला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:06 IST2017-09-03T23:23:30+5:302017-09-04T00:06:18+5:30

जालना येथून मुंबईला जाणार्या लक्झरी बसवरील चालकाचा झाड वाचिवण्याच्या प्रयत्नात बसवरील ताबा सुटल्याने बस अपघातग्रस्त झाली. मात्र प्रसंगावधान राखून चालकाने बसवर नियंत्रण मिळविल्याने अपघाताची मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या बसच्या अपघातामुळे बस रस्त्यातच अडकून पडल्याने शिर्डी, मुंबई, अकोले आदी ठिकाणी जाणार हा पर्यायी रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे.

Ghatit Private Bus Accident | घोटीत खासगी बसला अपघात

घोटीत खासगी बसला अपघात

घोटी : जालना येथून मुंबईला जाणार्या लक्झरी बसवरील चालकाचा झाड वाचिवण्याच्या प्रयत्नात बसवरील ताबा सुटल्याने बस अपघातग्रस्त झाली. मात्र प्रसंगावधान राखून चालकाने बसवर नियंत्रण मिळविल्याने अपघाताची मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या बसच्या अपघातामुळे बस रस्त्यातच अडकून पडल्याने शिर्डी, मुंबई, अकोले आदी ठिकाणी जाणार हा पर्यायी रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे.
घोटीजवळील देवळे पूल कमकुवत झाल्याने अवजड वाहनाची वाहतूक देवळे, खैरगाव, शेणवडमार्गे वळविण्यात आली आहे. अवजड वाहनांमुळे हा पर्यायी रस्ताही नष्ट झाल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून या रस्त्यावर वाहन चालवावे लागत आहे. रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जालना येथून ३५ प्रवासी घेऊन मुंबईला जाणारी सिद्धार्थ ट्रॅव्हलची बस क्रमांक एम. एच.०४,जी.पी.५५९२ ही शेणवड बु.येथील बंधाºयााखालून घोटी काळुस्ते रस्त्याकडे येत असताना, रस्त्यालगत असणाº्या झाडाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटला व संपूर्ण बस रस्त्यालगतच्या खोल भागाकडे गेली. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण मिळविल्याने बस रस्त्यालगत अडकली. दरम्यान, सर्व प्रवाशांना स्थानिक नागरिकांनी सुरक्षित बाहेर काढले.

Web Title: Ghatit Private Bus Accident