शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

गवतगंजीसाठी आरक्षित क्षेत्र ताब्यात घेण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:15 PM

महापालिककडे आरक्षित क्षेत्र ताब्यात घेण्यासाठी निधीची ओरड असताना आणि आर्थिक स्थिती पाहता केवळ रस्ते आणि शाळा-रुग्णालय यासाठीच आरक्षित क्षेत्र ताब्यात घेण्यास प्राधान्यक्रम देण्याचे ठरले असताना मौजे नाशिकमधील स. नं. २७० पै.मधील गवतगंजीसाठी आरक्षित असलेले सुमारे ४०३ चौ.मी. क्षेत्र खासगी वाटाघटीने ताब्यात घेण्याचा घाट महापालिका प्रशासनाकडून घातला जात आहे.

नाशिक : महापालिककडे आरक्षित क्षेत्र ताब्यात घेण्यासाठी निधीची ओरड असताना आणि आर्थिक स्थिती पाहता केवळ रस्ते आणि शाळा-रुग्णालय यासाठीच आरक्षित क्षेत्र ताब्यात घेण्यास प्राधान्यक्रम देण्याचे ठरले असताना मौजे नाशिकमधील स. नं. २७० पै.मधील गवतगंजीसाठी आरक्षित असलेले सुमारे ४०३ चौ.मी. क्षेत्र खासगी वाटाघटीने ताब्यात घेण्याचा घाट महापालिका प्रशासनाकडून घातला जात आहे. विशेष म्हणजे सदर जागा ही भाजपा नगरसेवकाची असून, जागामालकाने आधी टीडीआरसाठी अर्ज केलेला असतानाही खासगी वाटाघटीद्वारे सुमारे एक कोटी २३ लाख रुपये मोजण्याची तयारी प्रशासनाने दर्शविल्याने तो एक चर्चेचा विषय बनला आहे. सदरचा प्रस्ताव आता स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आल्याने स्थायीच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे.  महापालिका हद्दीत पूर्वी मोठ्या प्रमाणावर गोठे अस्तित्वात होते. त्यामुळे गवताच्या गंजीसाठी मागील विकास आराखड्यात आरक्षणे टाकण्यात आलेली होती. आता गोठे हद्दीबाहेर हलविण्याची तयारी महापालिका करत असताना गवतगंजीसाठी आरक्षित क्षेत्र ताब्यात घेऊन नेमके तेथे काय साध्य करणार, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. मौजे नाशिक स.नं. २७० पै.मधील शिल्लक राहिलेल्या ४०३ चौ.मी. क्षेत्राचा मोबदला रोख स्वरूपात आणि तो सुद्धा नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे मिळावा म्हणून जागामालकाने महापालिकेकडे मागणी केली होती. परंतु, खासगी वाटाघटी प्रकरणात मोबदला देणे शक्य नसल्याचे महापालिकेने जागामालकाला कळविले होते. त्यामुळे जागामालकाने टीडीआरची मागणी करत तसा प्रस्ताव नगररचना विभागाला सादर केला होता. परंतु, एप्रिल २०१७ मध्ये जागामालकाने पुन्हा रोख स्वरूपात वाटाघटीने मोबदल्याची मागणी केली. त्यानुसार, जून २०१७ मध्ये अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात १३ जुलै २०१७ रोजी बैठक होऊन वाटाघटी करण्यात आल्या आणि त्यात जागामालकाने तीन लक्ष रुपये कमी करण्यास संमती दर्शविली. वाटाघाटीद्वारे होणारा खर्च आणि भूसंपादनाद्वारे होणारा खर्च यामुळे मनपाची २५ लाख रुपयांची बचत होणार असल्याचा दावा करत आता महापालिकेच्या मिळकत विभागाने सदर गवताच्या गंजीसाठी आरक्षित क्षेत्राकरिता एक कोटी २३ लाख रुपये जागामालकाला मोजण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवला आहे.एकीकडे भूसंपादनाच्या प्रस्तावांचा प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी समिती स्थापन झालेली असताना आणि केवळ रस्ते, शाळा, रुग्णालय या अत्यावश्यक बाबींसाठीच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निश्चित केले गेले असताना प्रशासनाने गवताच्या गंजीसाठी आरक्षित क्षेत्र ताब्यात घेण्यासाठी दाखविलेली ही तत्परता चर्चेचा विषय बनली आहे. स्थायी समिती नेमका काय निर्णय घेते याकडे आता लक्ष लागून असणार आहे. ...मग टीडीआरसाठी आग्रह का नाही? सदर जागेचे जनरल मुखत्यारपत्र भाजपा नगरसेवकाच्या नावे आहे. सदर आरक्षित क्षेत्र ताब्यात घेण्यासाठी सुरुवातीला जागामालकाने स्वत:हून टीडीआर घेण्याची तयारी दाखविलेली होती. मात्र, टीडीआरसाठी आग्रह धरण्याऐवजी महापालिका प्रशासनाकडून खासगी वाटाघटीने जागा संपादनासाठी घातलेला घाट संशयास्पद ठरत आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयNashikनाशिक