क्रीडांगणाच्या जागेवर पार्किंग शेडचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:41 IST2020-12-17T04:41:33+5:302020-12-17T04:41:33+5:30

शहरातील नयापुरा वार्डातील अजिज कल्लु क्रीडांगणाच्या भूखंडावर मागील अनेक वर्षांपासून शहरातील युवक क्रिकेट खेळतात. विशेषत: ही जागा क्रीडांगणासाठी आरक्षित ...

Ghat of parking shed on playground space | क्रीडांगणाच्या जागेवर पार्किंग शेडचा घाट

क्रीडांगणाच्या जागेवर पार्किंग शेडचा घाट

शहरातील नयापुरा वार्डातील अजिज कल्लु क्रीडांगणाच्या भूखंडावर मागील अनेक वर्षांपासून शहरातील युवक क्रिकेट खेळतात. विशेषत: ही जागा क्रीडांगणासाठी आरक्षित करण्यात आली आहे; मात्र मनपा आयुक्त कासार यांनी सदर जागा खासगी ठेकेदाराची वाहने उभी करण्यासाठी तसेच शेड बांधण्यासाठी दिली आहे, एवढेच नव्हे तर शेड बांधण्यासाठी दोन वेळा निविदाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. कुठल्याही परिस्थितीत क्रीडांगणाच्या भूखंडाचे आरक्षणात बदल करण्यात येऊ नये, असे असतानाही आयुक्त कासार यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत क्रिकेट प्रेमींनी नाराजी व्यक्त करीत आयुक्तांच्या दालनाबाहेर क्रिकेट खेळून निषेध व्यक्त केला. यावेळी सिटी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नगरसेवक मोहम्मद आमिन, मोहम्मद फारुख, विरोधी पक्षनेत्या शान ए हिंद, एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेझ यांच्यासह क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते.

फोटो- १६ मालेगाव क्रिकेट

आयुक्तांच्या दालनाबाहेर क्रिकेट खेळून निषेध करताना क्रिकेटप्रेमी व नगरसेवक.

===Photopath===

161220\16nsk_34_16122020_13.jpg

===Caption===

आयुक्तांच्या दालनाबाहेर क्रिकेट खेळून निषेध करताना क्रिकेटप्रेमी व नगरसेवक. 

Web Title: Ghat of parking shed on playground space