शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

नखे मिळविण्यासाठी ऊसतोड मजुराने नाशिकमध्ये मृत बिबट्याचा कापला पंजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 15:27 IST

यावेळी सहा महिन्यांचा नर जातीचा बिबट्याचा बछडा कामगारांना मृतावस्थेत मिळून आला. कामगारांनी ही बाब शेतमालकाच्या लक्षात आणून दिली.

ठळक मुद्दे मृत बिबट्याच्या बछड्याची पाहणी करत त्यांनी पंचनामा सुरू केलानैसर्गिक मृत्यू शवविच्छेदनातून स्पष्ट

नाशिक : इगतपुरी वनपरिक्षेत्राच्या हद्दीमधील शेणीत या गावाच्या शिवारातील एका ऊसशेतीमध्ये सहा महिन्याचा बछडा मृतावस्थेत आढळला असता वनविभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी उजव्या पायाचा पंजा कापलेला असल्याचे निदर्शनास आले. ऊसतोड कामगारांच्या टोळीतील एका मजूराला वन अधिकाºयांनी संशयावरुन ताब्यात घेतले. नखांसांठी पंजा कापल्याची कबुली त्याने चार दिवसांच्या वन कोठडीत दिली आहे.याबाबत वनविभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, सिन्नर-घोटी रस्त्यावर असलेल्या शेणीत गावाच्या शिवारात एका ऊसशेतीमध्ये ऊसतोड सुरू होती. यावेळी सहा महिन्यांचा नर जातीचा बिबट्याचा बछडा कामगारांना मृतावस्थेत मिळून आला. कामगारांनी ही बाब शेतमालकाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर पोलीस पाटील यांना ही घटना शेतक-यांनी कळविली. पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांना दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत बिबट्याच्या बछड्याची पाहणी करत त्यांनी पंचनामा सुरू केला. यावेळी बिबट्याच्या उजव्या पायाचा एक पंजा काही वेळेपुर्वीच कापल्याचे आढळून आले. यासाठी कोयत्याचा वापर केल्याचे त्यांच्या लक्षात आले. वनअधिकारी-कर्मचाºयांना बघून काही ऊसतोड कामगारांच्या वर्तणुक बदलल्याने संशयावरुन कर्मचा-यांनी एका कामगाराला ताब्यात घेतले. यावेळी त्याला वनहिसका दाखविल्यानंतर संशयित संशयित कारभारी बाबुराव पवार (२१, रा.वैजापुर) याने गुन्ह्याची कबुली दिली. दोन दिवसांपासून बछडा मृतावस्थेत पडून होता व त्यामुळे मला नखांचा मोह झाला आणि त्यासाठी पंजा कापल्याची कबुली पवार याने दिल्याची माहिती ढोमसे यांनी दिली. दरम्यान, वन्यजीव कायद्यानुसार संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची वनकोठडी सुनावली. वनविभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळावरून कोयता, मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास ढोमसे करीत आहेत.नैसर्गिक मृत्यू शवविच्छेदनातून स्पष्टबिबट्याचा बछड्याचा मृत्यू शिकारीच्या माध्यमातून नव्हे तर नैसर्गिकरित्या झाला असल्याचे पशुवैद्यकिय अधिकाºयांनी केलेल्या शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. बिबट्याचा बछडा दोन दिवसांपासून मृत झाला असून त्याला न्युमोनिया व उष्माघाताचा फटका बसल्याचे शवविच्छेदन करणाºया वैद्यकिय अधिका-यांनी म्हटले आहे, अशी माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे.---

टॅग्स :leopardबिबट्याDeathमृत्यूwildlifeवन्यजीवforest departmentवनविभागNashikनाशिक