कुंभमेळ्यासाठी जादा निधी मिळावा : तावडे

By Admin | Updated: July 12, 2014 00:23 IST2014-07-12T00:03:47+5:302014-07-12T00:23:52+5:30

कुंभमेळ्यासाठी जादा निधी मिळावा : तावडे

Get more funding for Kumbh Mela: Tawde | कुंभमेळ्यासाठी जादा निधी मिळावा : तावडे

कुंभमेळ्यासाठी जादा निधी मिळावा : तावडे

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जादा निधी मिळावा म्हणून उत्तर महाराष्ट्रातील खासदारांसह आपण केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची भेट घेणार आहोत,अशी माहिती विरोधी पक्षनेते आमदार विनोद तावडे यांनी दिली. बंद विमानतळ सुरू करण्यासारखे खोटे स्टंट केल्यानेच छगन भुजबळ यांचे विमान दिल्लीला टेक आॅफ होऊ शकले नाही,
अशी खिल्लीही तावडे यांनी
उडविली.
नाशिकला आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर झाला; मात्र कामांना अद्यापही सुरुवात झालेली नाही. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारने तेथील सिंहस्थ कुंभमेळ्याचे जगभरात पर्यटनाचे मार्केटिंग केले; मात्र छगन भुजबळ नाशिकला कुंभमेळा असताना आणि येथील पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटनमंत्री असूनही सिंहस्थाचे जगभरात पर्यटनाच्या दृष्टीने मार्केटिंग झालेले नाही, असा आरोप तावडे यांनी केला. नाशिकला धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात जास्तीत जास्त निधी मिळावा,
यासाठी उत्तर महाराष्ट्रातील खासदारांसह आपण वित्तमंत्री
अरुण जेटली यांची १५ जुलै रोजी भेट घेणार असून, त्यांंच्याकडे कुंभमेळ्यासाठी जास्तीत जास्त
निधी मिळण्याबाबत चर्चा करणार असल्याचे तावडे यांनी
सांगितले.
इतकेच नव्हे तर धुळे-जळगाव महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी अनुकूलता दर्शविली असून, आधी राज्य शासनाने या महामार्गावरील जमिनींचे भूसंपादन करावे, केंद्र शासन तत्काळ काम सुरू करेल,असे आश्वासनच गडकरी यांनी दिले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याची घोषणा आघाडी सरकारने केली, मात्र ती फसवीच असल्याचे दिसून येते.
कारण आजपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या कर्जाचे पुनर्गठन झालेले नाही.
नाशिक व औरंगाबाद ही प्रगतिशील शहरे असून, या शहरांना विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचे आमचे धोरण राहणार आहे. यावेळी माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर, सुहास फरांदे, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, गिरीश पालवे, बिरदीचंद नहार आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Get more funding for Kumbh Mela: Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.