शाळांचे मार्गदर्शक फलक लावावेत
By Admin | Updated: January 21, 2016 22:36 IST2016-01-21T22:35:07+5:302016-01-21T22:36:57+5:30
शाळांचे मार्गदर्शक फलक लावावेत

शाळांचे मार्गदर्शक फलक लावावेत
नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील दत्तमंदिर सिग्नल ते उपनगर नाक्यापर्यंत असलेल्या शाळा-महाविद्यालयाजवळ त्वरित गतिरोधक व मार्गदर्शक फलक लावावेत, अशी मागणी निवेदनात केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिकरोड विभागाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यू. जी. प्रभा व वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक-पुणे महामार्गावरील दत्तमंदिर सिग्नल ते उपनगर नाका दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा शाळा, महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालय व दाट लोकवस्ती आहे. भर लोकवस्तीतून जाणाऱ्या या महामार्गावर दिवस-रात्र वाहतुकीची मोठी वर्दळ असते. या ठिकाणी गतिरोधक, वेगमर्यादा, दिशा व मार्गदर्शक फलक नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले
आहेत. फेम चौक ते दत्तमंदिर
मार्गावर गतिरोधकाबरोबरच पोलीस चौकी, तसेच वाहतूक पोलीस असावेत, अशीही मागणी करण्यात आली.
निवेदनावर नाशिकरोड मनसे अध्यक्ष प्रकाश कोरडे, किशोर जाचक, संतोष सहाणे, संतोष पिल्ले, सुरेंद्र शेजवळ, प्रमोद साखरे, विक्रम कदम, साहेबराव खर्जुल, अतुल धोंगडे, श्याम गोहाड, सचिन शिसोदिया, शशी चौधरी, नितीन पंडित, भााऊसाहेब ठाकरे, भानुमती आहिरे, अक्षय एडके आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)