शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या दहा दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 01:01 IST

शहर व परिसरात दुचाकीचोरी होण्याचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. दुचाकी चोरट्यांच्या मागावर गुन्हे शाखा असून, गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाला दोघा दुचाकीचोरांना ताब्यात घेण्यास यश आले आहे. त्यांच्याकडून तीन लाख ९० हजारांच्या दहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

नाशिक : शहर व परिसरात दुचाकीचोरी होण्याचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. दुचाकी चोरट्यांच्या मागावर गुन्हे शाखा असून, गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाला दोघा दुचाकीचोरांना ताब्यात घेण्यास यश आले आहे. त्यांच्याकडून तीन लाख ९० हजारांच्या दहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.याबाबत गुन्हे शाखेने दिलेली माहिती अशी, गुन्हे शाखेचे हवालदार रवींद्र बागुल, आसिफ तांबोळी, विशाल काठे हे गस्तीवर असताना बागुल यांना गुप्त बातमीदाराकडून दुचाकी चोरट्यांची खात्रीशीर माहिती मिळाली.  दोघे चोरटे गोल्फ क्लब पार्किंगजवळ येणार असल्याचे बातमीदाराकडून सांगितले गेले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी सदर माहिती पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना सांगितली. त्यानंतर पथकाने या परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित समाधान उर्फ गोकुळ बळीराम गव्हाणे (२५), प्रशांत भगवान जाधव (२०, दोघे रा. पळसे), हे दोघे होंडा शाइन दुचाकीवरून आले. त्यांच्या दुचाकीला कुठल्याहीप्रकारे क्रमांक नव्हता.  त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. यावेळी पथकाने त्यांना शिताफीने अटक केली. त्यांची कसूच चौकशी केली असता त्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या वाहनतळातून त्यांच्या ताब्यातील दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.  यानंतर पोलिसांनी त्यांना त्या गुन्ह्यात अटक करून तत्काळ पोलीस कोठडी मागितली.पोलीस कोठडीत : चोरट्यांची कबुलीपोलीस कोठडीदरम्यान दोघा संशयित चोरट्यांनी शहरातील जिल्हा रुग्णालय वाहनतळ, धामणगाव येथील एस.एम.बी.टी. वैद्यकीय महाविद्यालय आवार, बिटको रुग्णालय, देवळाली कॅम्प परिसरातील लॉन्स यांसह बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून दुचाकीचोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील एकूण चार देवळाली पोलीस ठाणे, नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतून तसेच वाडीवºहे हद्दीतून प्रत्येकी एक असे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून ३ लाख ९० हजार रुपये किमतीच्या दहा दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी