शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

संचारबंदीमुळे कळवणचा शुभम अडकला जॉर्जियात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 10:50 PM

कळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जॉर्जियातही अघोषित बंदी घालण्यात आली असून, तेथील विमानसेवादेखील बंद असल्याने उच्च शिक्षणासाठी टिबिलिसी शहरात गेलेले महाराष्ट्रातील २०० विद्यार्थी अडकले आहेत. यात कळवणच्या शुभम रमाकांत वाघ याच्यासह नाशिक जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे.

ठळक मुद्देपरतण्याची पंचाईत : शिक्षणासाठी गेला आणि कोरोनामुळे अडकला

लोकमत नेटवर्ककळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जॉर्जियातही अघोषित बंदी घालण्यात आली असून, तेथील विमानसेवादेखील बंद असल्याने उच्च शिक्षणासाठी टिबिलिसी शहरात गेलेले महाराष्ट्रातील २०० विद्यार्थी अडकले आहेत. यात कळवणच्या शुभम रमाकांत वाघ याच्यासह नाशिक जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे.जॉर्जिया विद्यापीठात शुभम वाघ वैद्यकीय उच्चशिक्षण घेत असून, तो एमबीबीएस द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याचे पालक आरकेएम माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक आहेत. जार्जियात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील दोनशे विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्याची आस लागलेली आहे.येत्या काही दिवसात त्यांची परीक्षा असून, परीक्षा झाल्यानंतर आम्हाला मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करावे, अशी हाक त्यांच्याकडून दिली जात आहे. आमदार नितीन पवार यांनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अमित देशमुख यांच्यासह अन्य मंत्र्यांशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शुभम दररोज व्हॉट्सअ‍ॅपद्वारे व्हिडीओ कॉलिंंग करून जेवणाचे व तेथील परिस्थितीचे फोटो पाठवतो, काही दिवसात त्याची परीक्षा असून, सध्या सर्व विद्यार्थी संकटात आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने पावले उचलून सहकार्य करणे अपेक्षित आहे.परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मायदेशी घेऊन येण्यासाठी भारतीय प्रशासनाने व्यवस्था करावी. - रमाकांत वाघ, पालक, कळवण शुभम हा एकुलता एक मुलगा विदेशात अडकल्याने वाघ दांपत्य प्रचंड तणावाखाली आहे. जॉर्जियात हवामान बदल झाल्याने त्याठिकाणी बर्फवृष्टी होत आहे. परिणामी जॉर्जिया ते भारत विमानसेवाही बंद करण्यात आल्याने महाराष्ट्रातील मुले जॉर्जियात अडकून पडली आहेत. तेथील सरकारने अघोषित बंदी लागू केल्याने खाद्यपदार्थ मिळण्यासह मास्क, सॅनिटायझर आदी आवश्यक सामग्री मिळण्यातही प्रचंड अडचणी येत असल्याचे शुभमचे पालक रमाकांत वाघ यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थी