संचारबंदीमुळे कळवणचा शुभम अडकला जॉर्जियात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 10:50 PM2020-04-04T22:50:54+5:302020-04-04T23:48:26+5:30

कळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जॉर्जियातही अघोषित बंदी घालण्यात आली असून, तेथील विमानसेवादेखील बंद असल्याने उच्च शिक्षणासाठी टिबिलिसी शहरात गेलेले महाराष्ट्रातील २०० विद्यार्थी अडकले आहेत. यात कळवणच्या शुभम रमाकांत वाघ याच्यासह नाशिक जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे.

Georgia banned from communicating with ... | संचारबंदीमुळे कळवणचा शुभम अडकला जॉर्जियात...

जॉर्जियात अडकलेले विद्यार्थी.

Next
ठळक मुद्देपरतण्याची पंचाईत : शिक्षणासाठी गेला आणि कोरोनामुळे अडकला

लोकमत नेटवर्क
कळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जॉर्जियातही अघोषित बंदी घालण्यात आली असून, तेथील विमानसेवादेखील बंद असल्याने उच्च शिक्षणासाठी टिबिलिसी शहरात गेलेले महाराष्ट्रातील २०० विद्यार्थी अडकले आहेत. यात कळवणच्या शुभम रमाकांत वाघ याच्यासह नाशिक जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे.
जॉर्जिया विद्यापीठात शुभम वाघ वैद्यकीय उच्चशिक्षण घेत असून, तो एमबीबीएस द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याचे पालक आरकेएम माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक आहेत. जार्जियात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील दोनशे विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्याची आस लागलेली आहे.
येत्या काही दिवसात त्यांची परीक्षा असून, परीक्षा झाल्यानंतर आम्हाला मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करावे, अशी हाक त्यांच्याकडून दिली जात आहे. आमदार नितीन पवार यांनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अमित देशमुख यांच्यासह अन्य मंत्र्यांशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शुभम दररोज व्हॉट्सअ‍ॅपद्वारे व्हिडीओ कॉलिंंग करून जेवणाचे व तेथील परिस्थितीचे फोटो पाठवतो, काही दिवसात त्याची परीक्षा असून, सध्या सर्व विद्यार्थी संकटात आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने पावले उचलून सहकार्य करणे अपेक्षित आहे.परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मायदेशी घेऊन येण्यासाठी भारतीय प्रशासनाने व्यवस्था करावी. - रमाकांत वाघ, पालक, कळवण शुभम हा एकुलता एक मुलगा विदेशात अडकल्याने वाघ दांपत्य प्रचंड तणावाखाली आहे. जॉर्जियात हवामान बदल झाल्याने त्याठिकाणी बर्फवृष्टी होत आहे. परिणामी जॉर्जिया ते भारत विमानसेवाही बंद करण्यात आल्याने महाराष्ट्रातील मुले जॉर्जियात अडकून पडली आहेत. तेथील सरकारने अघोषित बंदी लागू केल्याने खाद्यपदार्थ मिळण्यासह मास्क, सॅनिटायझर आदी आवश्यक सामग्री मिळण्यातही प्रचंड अडचणी येत असल्याचे शुभमचे पालक रमाकांत वाघ यांनी सांगितले.

Web Title: Georgia banned from communicating with ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.