येवला व्यापारी महासंघाची सर्वसाधारण सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:13 IST2021-07-25T04:13:38+5:302021-07-25T04:13:38+5:30
ऑनलाइन विक्री पद्धती व्यापाऱ्यांसाठी तापदायक ठरत आहे. या समस्येला व्यापाऱ्यांनी कसे समोर जावे, यासंदर्भात टिप्स मिळवण्यासह जागृतीसाठी व्याख्यान आयोजित ...

येवला व्यापारी महासंघाची सर्वसाधारण सभा
ऑनलाइन विक्री पद्धती व्यापाऱ्यांसाठी तापदायक ठरत आहे. या समस्येला व्यापाऱ्यांनी कसे समोर जावे, यासंदर्भात टिप्स मिळवण्यासह जागृतीसाठी व्याख्यान आयोजित करण्याचा व महासंघाचा पहिला वर्धापनदिन सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्यापारी राजेंद्र चिनगी होते. प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आले. अजय पावटेकर, राहुल लोणारी, रुपेश मंडलेचा, विजय चंडालिया, दीपक पाटोदकर, शैलेश लाड, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नंदू भावसार, हर्षल छाजेड, ज्ञानेश्वर खैरमोडे आदींनी मनोगत व्यक्त केले. महासंघाच्यावतीने वेगवेगळ्या संस्थेवर निवड झालेल्या किरण घाटकर, मनोज भागवत व दीपक लोणारी यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात महासंघाच्या कामकाजाचा लेखाजोखा तसेच आगामी भूमिका महासंघाचे अध्यक्ष योगेश सोनवणे यांनी मांडली. सूत्रसंचालन उपाध्यक्ष रवी पवार यांनी केले. सभेस अविनाश कुकर, रितेश बुब, सुमित थोरात, सचिन सोनवणे, हेमचंद्र समदडिया, अतुल काथवटे, अतुल घटे, कुणाल सोनवणे आदींसह व्यापारी उपस्थित होते. (२४ येवला १)
240721\24nsk_16_24072021_13.jpg
२४ येवला १