सामान्य रुग्णालयात हल्ला; खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:25 IST2021-02-18T04:25:30+5:302021-02-18T04:25:30+5:30

शेख एजाज शेख महेमूद (३५, रा. डॉ. जाकीर हुसेननगर, इदगाह झोपडपट्टी) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीचे भारत बाजार भागात ...

General hospital attack; Attempted murder | सामान्य रुग्णालयात हल्ला; खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

सामान्य रुग्णालयात हल्ला; खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

शेख एजाज शेख महेमूद (३५, रा. डॉ. जाकीर हुसेननगर, इदगाह झोपडपट्टी) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीचे भारत बाजार भागात फर्निचरचे दुकान आहे. मंगळवारी (दि.१६) दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेख एजाज आपल्या दुकानात फर्निचरचे सामान ठेवण्यासाठी गेला होता. त्यावेळी अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी पत्र्याचे शेड दिसले म्हणून शेख यांनी इम्रान खान व कलंदर खान यांना पत्र्याचे शेड काढण्यास सांगितले. याचा राग आल्याने इम्रानने त्याच्या हातातील कटरने फिर्यादीच्या नाकावर व मानेवर वार केले, तर कलंदर खान याने शिवीगाळ केली. नागरिकांच्या मदतीने जखमी शेख यांना सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. इम्रान खान, कलंदर खान, तन्वीर खान व त्याचा दाजी सईद यांनी रुग्णालयात येऊन शेख यांना शिवीगाळ केली. शेख यांच्यावर वाॅर्ड क्र.६ मध्ये उपचार सुरू असताना तन्वीर कलंदर खान हा हातात चाकू घेऊन वाॅर्डात आला. त्याने शेख यांच्या पोटावर चाकू मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेख यांचा भाऊ फय्याज याने हात धरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता तन्वीरने फय्याजच्या दंडावर, पोटावर चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक आहेर करीत आहेत.

Web Title: General hospital attack; Attempted murder