महापालिकेची मंगळवारी महासभा
By Admin | Updated: August 14, 2016 02:04 IST2016-08-14T02:02:23+5:302016-08-14T02:04:57+5:30
वृक्षतोडीवर लक्षवेधी : ‘अग्निशमन’ संशयाच्या घेऱ्यात

महापालिकेची मंगळवारी महासभा
नाशिक : महापालिकेची महासभा येत्या मंगळवारी (दि. १६) सकाळी ११.३० वाजता होत असून, यावेळी शिवसेनेकडून गंगापूररोडवरील धोकादायक झाडांबाबत लक्षवेधी मांडली जाणार आहे. याशिवाय, अग्निशमन विभागाकडून नूतनीकरण दाखल्यासंदर्भात दडवून ठेवलेल्या आदेशाबाबतही प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे. दरम्यान, महासभेत महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
मंगळवारी होणाऱ्या महापालिकेच्या महासभेत प्रामुख्याने गंगापूर रोडवरील धोकादायक वृक्षांबाबत प्रशासनाला जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गंगापूर रोडचे विस्तारीकरण केले, परंतु रस्त्यांत अडथळे ठरणारी अनेक झाडे ‘जैसे थे’ असल्याने रोज अपघातांना निमंत्रण मिळत आहे. शुक्रवारी नवशा गणपतीजवळील एक वाळलेले झाड कोसळल्याने दुचाकीवरून जाणारे दोन कामगार जखमी झाले होते, तर त्यापूर्वी एका शाळेच्या बसवर झाड कोसळून चालक जखमी झाला होता.